मयूर राणे
Mumbai Crime News : संसार मोडल्याच्या रागातून सासूला पेटवून जावयाने स्वत:लाही पेटवून घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुलुंडच्या नवघर परिसरात एका ५६ वर्षीय व्यक्तीने आपल्या ७२ वर्षीय सासूवर टेम्पोमध्ये अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर तिला पेटवून दिले आणि नंतर स्वत:लाही पेटवून घेतले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. कृष्णा दाजी आष्टणकर आणि सासू बाबी दाजी उसरे अशी मृतांची नावे आहेत.
कौटुंबिक कलहातून कृष्णा अटनकर यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. त्यास पत्नीची आई बाबी दाजी ही कारणीभूत असल्याचा राग कृष्णा ह्याच्या डोक्यात होता. याच रागातून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कृष्णाने त्याची सासू बाबीला मिठागररोड, नाणेपाडा मुलुंड पूर्व येथे भेटायला बोलावले. रस्त्यात वाद नको म्हणून कृष्णाने बाबी यांना टेम्पोत नेहले. त्यानंतर काही समजायच्या आतच बाबी यांच्यावर लोखंडी हातोडीने हल्ला चढवला.
त्यानंतर गाडीतील थिनर व पेट्रोल बाबी यांच्या अंगावर ओतून त्यांना पेटवून देत बाबी यांची हत्या केली. त्यानंतर तेच पेट्रोल व थिनर स्वत:च्या अंगावर ओतून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलिसांनी सुरवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र चौकशीनंतर हा हत्येचा प्रकार असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील कलमात वाढ केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा आपल्या पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे निराश आणि संतापला होता. पत्नीच्या निर्णयावर आपल्या सासूचा प्रभाव पडत असल्याचा त्याला संशय होता, त्यामुळे वारंवार भांडणे होत होती. पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर कृष्णा हा टेम्पो चालक त्याच्या वाहनात एकटाच राहत होता. सोमवारी कृष्णाने सासूला हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने आपल्या टेम्पोमध्ये बसवले. आत गेल्यावर त्याने शटर लॉक केले, तिच्यावर जड वस्तूने हल्ला केला, पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले. या प्रक्रियेत, कृष्णाही आगीच्या भक्ष्यस्थानी अडकला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. नवघर पोलीस आणि अग्निशमन दलाने गंभीर भाजलेल्या दोघांना वीर सावरकर रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.