Gujarat ATS: गुजरात एटीएसची मोठी कारवाई; 500 किलो ड्रग्स जप्त, इरानी बोटीतून होत होती तस्करी

Gujrat Breaking: गुजरात एटीएसने पोरबंदर येथे ५०० किलो ड्रग्स जप्त केलंय.
गुजरात एटीएसची मोठी कारवाई; 500 किलो ड्रग्स जप्त, इरानी बोटीतून होत होती तस्करी
Gujarat ATSSaam
Published On

गुजरात: गुजरात एटीएस आणि एनसीबी नॉरकोटिक्स कंट्रोल ब्यूरो यांच्या पथकाने मोठी करावाई केलीय. एनसीबी आणि एटीएस यांच्या संयुक्त पथकाने ५०० किलो पेक्षा अधिक ड्रग्स जप्त केलंय. ही कारवाई गुरुवारी रात्री पोरबंदर येथील समुद्रात करण्यात आली.

एनसीबी, नौसेना आणि गुजरात पोलिसांच्या एटीएस द्वारे करण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत भारतीय जलक्षेत्रात साधारण ५०० किलोग्रम मेथचा साठा पकडण्यात आला. या कारवाईत ८ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय. हे इराणी असेलल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान याआधी गुजरात एटीएसच्या पथकाने एका कारवाईत ६ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. या पथकाने या टोळीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की पोरबंदर जवळ ६ पाकिस्तानी नागिरकांना अटक करण्यात आली. या लोकांकडे पथकाला ४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त ड्रग्स आणि नशेचे औषध जप्त करण्यात आली होती.

गुजरात एटीएसची मोठी कारवाई; 500 किलो ड्रग्स जप्त, इरानी बोटीतून होत होती तस्करी
Gondia Crime: तिरोडा-गोंदिया मार्गावर १५ लाखांची रोख रक्कम जप्त, निवडणूक भरारी पथकाची कारवाई

गुजरात एटीएसच्या या कारवाईनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी एटीएसचं अभिनंदन केलंय. पंतप्रधान यांच्या नशा मुक्त भारताच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आमच्या तपास यंत्रणेनेने गुजरातमध्ये एका आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला. साधारण ७०० किलोग्रमपेक्षा जास्त वजनी अमली पदार्थ एटीएस आणि एनसीबीच्या पथकाने जप्त केली आहेत.

नशामुक्त भारत या स्वप्नाप्रती आमची बांधिलकी आणि ते साध्य करण्यासाठी आमच्या एजन्सींमधील अखंड समन्वयाचे हे संयुक्त ऑपरेशन हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल एजन्सींचे माझे मनःपूर्वक अभिनंदन. अशी पोस्ट अमित शाह यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com