Latur Crime News: 14 वर्षीय शाळकरी मुलाची क्रूरपणे हत्या; धक्कादायक घटनेनं लातूर हादरलं

Udgir Crime News: उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गोविंद घुगे असं मृत मुलाचं नाव आहे. आपल्या मुलाचा कोणीतरी खून केलाय असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Latur Crime News
Latur Crime NewsSaam TV

संदिप भोसले

Latur News:

लातुरमधील उदगीर येथून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नराधमांनी त्याचा चेहरा दगडाने ठेचून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केलाय. सदर घटनेमुळे उदगीर हादरून गेलंय.

Latur Crime News
Latur Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केली आईची हत्या; लातूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुमठा येथे एका १४ वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना १३ जानेवारी रोज शनिवारी १२ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गोविंद घुगे असं मृत मुलाचं नाव आहे. आपल्या मुलाचा कोणीतरी खून केलाय असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

संतोष १० जानेवारी रोजी घरातून बाहेर गेला तो नंतर परतलाच नाही. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. १३ जानेवारी रोजी कुमठा शेत शिवारात या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. आपल्या मुलाला पाहून त्याच्या आई बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरल्याच्या संशयावरून या मुलाची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी क्रूरतेनं त्याला संपवलंय. त्याची ओळख कुणाला पटूनये यासाठी आरोपींनी त्याचा चेहरा विद्रूप केला. इतकेच नाही तर त्यांनी मुलाचे केस देखील कापून टाकले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम ३०२,२०१ भादवी प्रमाणे १३ जानेवारी रोज शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

Latur Crime News
Pune Crime News : मुळशी तालुक्यात माजी सरपंचांच्या घरातून सात लाखांचे दागिने लंपास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com