
कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळवर २४ गुन्हे दाखल आहेत.
निलेश घायवळ लंडनमार्गे स्विझर्लंडमध्ये असल्याची माहिती.
पोलिसांनी निलेश घायवळची बँक खाती गोठवली असून त्याची मालमत्ता सील केली आहे.
कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळची बँक खाते गोठवण्यात आली आहेत. तसेच त्याची मालमत्ता देखील सील करण्यात आलीय. गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश घायवळ लंडनला पळून गेला असून तो सध्या स्विझर्लंडमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. वॉन्टेड असलेला निलेश घायवळच्या गुंडगिरीची कुंडली समोर आलीय.
उच्च शिक्षण घेतलेला निलेश घायवळवर खंडणी, अपहरण, हत्या अशी विविध २४ गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ घायवळ टोळीचा म्होरक्या आहे. २६ वर्षापूर्वी त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. घायवळचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर आलंय. तो पुण्यातील गँगवॉर, हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यामध्ये सहभागी होता.
निलेश घायवळ जामखेडचा तालुक्यातील सोनेगावचा रहिवाशी आहे. निलेश घायवळविरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात २३ ते २४ गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ उच्चशिक्षित असून त्याच मास्टर इन कॉमर्सपर्यंत शिक्षण झालंय. निलेश घायवळ आधी कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीत काम करायचा. कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत होती. पण गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गँग घायवळ गँगमध्ये गँगवॉर झालेत.
निलेश घायवळ याच्यावर १९९९ मध्ये पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पहिला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर १९९९, २०००, आणि २००१ मध्ये घायवळ याच्यावर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, दंगल करणे, खून आणि खुनाचा कट रचणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले. पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये घायवळ याच्यावर एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण २४ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तर धाराशिव बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये देखील खंडणी अपहरण आणि इतर अनेक गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.