Kalyan Crime News: दिवसाढवळ्या घरात मारायचे डल्ला; पोलिसांनी सापळा रचला, सराईत चोरटे असे अडकले जाळ्यात

Kalyan Crime News in Marathi : लोकांच्या घरात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. भोलानाथ जैस्वाल आणि बाबू देवनाथ अशी दोन्ही चोरट्यांची नावे आहेत.
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Crime News:

लोकांच्या घरात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. भोलानाथ जैस्वाल आणि बाबू देवनाथ अशी दोन्ही चोरट्यांची नावे आहेत. भोलानाथ हा उत्तरप्रदेशात राहणारा आहे. तर बाबू हा बंगालचा राहणारा आहे. या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (Kalyan Crime News)

कल्याणमध्ये हे दोघे चोरटे तीन-तीन दिवस इमारतीत जाऊन बंद घरांची रेकी करायचे. कुठे चोरी करायची? तो प्लॅन आखून चोरी करायचे. चोरटे चोरी केलेले दागिने विकून गावी जाणार होते. त्या आधीच पोलिसांना त्यांना पकडले आहे. पोलिसांनी या चोरट्याकडून पाच लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan News
Kanpur Crime News: संध्याकाळी मित्रांसोबत केक कापला, सकाळी सापडला मृतदेह; विद्यार्थ्यासोबत वाढदिवसाच्या पार्टीत घडली भयंकर घटना

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात रात्री आणि दिवसाढवळ्या काही घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. सातत्याने या चोरीच्या घटना सुरु होत्या. चोरीच्या अनेक तक्रारी पोलिसांत आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला. अखेर गुप्त माहितीदाराच्या मदतीने अनेक तांत्रिक बाबी तपासून पोलिसांना चोरटे उल्हासनगर येथे एका ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली .

कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी दीनकर पगारे,पोलीस अधिकारी रवीराज मदने, पोलीस कर्मचारी सुशिल हंडे, नरेश दळवी, सचिन कदम हे या चोरट्यांच्या मागावर होते.

Kalyan News
Nashik Crime News : जुन्या भांडणातून मुलाचे अपहरण; टोळक्याने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

पोलिसांच्या या पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध सुरु केला. या चोरट्यांना पकडण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने एक सापळा रचला. त्या कारवाईत पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांकडून ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com