Kalyan Crime: धावत्या ट्रेनमधून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न..चोरट्यामुळे निष्पाप प्रवाशाचा अपघाती मृत्यू; नेमकं काय घडलं?

Crime News: धावत्या ट्रेनमध्ये एक प्रवासी व्हिडिओ काढत असताना एका चोरट्याने फटका मारुन मोबाईल चोरल्याची घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान घडली होती.
Kalyan Crime News:
Kalyan Crime News: Saamtv

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. २८ मार्च २०२४

Kalyan Crime News:

धावत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाचा फटका मारुन मोबाईल पळवणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र दुर्दैवी बाब म्हणजे ज्या प्रवाशाचा मोबाईल चोरण्यात आला त्याचा चोरट्याने फटका मारल्याने तोल जाऊन रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रभास भणगे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धावत्या ट्रेनमध्ये एक प्रवासी व्हिडिओ काढत असताना एका चोरट्याने फटका मारुन मोबाईल चोरल्याची घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान घडली होती. याप्रकरणी तपास करत असताना कल्याण रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आकाश जाधव या तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चोरीचा मोबाईलही आढळून आला होता.

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी हा माोबाईल सुरु केला असता तो पुण्यातील प्रभास भणगे यांचा असल्याची माहिती मिळाली. तसेच पोलिसांनी अधिक तपास केला असता प्रभास भणगे याचा २५ तारखेच्या मध्यरात्री कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानका दरम्यान प्रभास यांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime News:
Parbhani : परभणीत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध, 'आप'च्या रक्तदान शिबीरात 100 जणांचा सहभाग

प्रकाश भणगे हा पुण्यात बँकेत कामाला होता. पुण्याहून होळीच्या कार्यक्रमासाठी तो मुंबईला आला होता. २५ मार्चच्या रात्री पुण्याकडे परत जाताना कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानका दरम्यान चोरट्याने फटका मारुन त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. याचवेळी फटका मारला तेव्हा प्रभास भणगे हे खाली पडले. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Crime News in Marathi)

Kalyan Crime News:
Madha Lok Sabha Election 2024 : महेश चिवटेंनी शिवसेनेचा तमाशा केला : महावीर देशमुख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com