Kalyan Crime: कार लोनचा वाद टोकाला; मित्रानेच मित्रावर केला प्राणघातक हल्ला

Kalyan Crime News: कल्याण येथे एका मित्राने आपल्या मित्राचा गाडीवरून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख

Crime News: कल्याण येथे एका मित्राने आपल्या मित्राचा गाडीवरून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन व्यावसायिक मित्रांनी कर्जावर एक महागडी कार घेतली. काही दिवस कारच्या हप्त्याचे पैसे दोघे मिळून भरले आणि कारचा मिळून वापरत केला. मात्र काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे त्यांच्यातील पार्टनरशीप तुटली. त्यानंतर कर वापरण्यावरून वाद झाल्यामुळे एका मित्राने दुसऱ्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला.

कल्याण जवळील आडीवली परिसरात रोहीत राठोड आणि कृष्णा चौधरी हे राहतात. ते लहानपणापासूनचे मित्र आहे. दोघेही फायनान्सचा व्यवसाय करतात. त्यांनी काही महिन्यापूर्वी पार्टनरशीपमध्ये क्रेटा ही महागडी कार घेतली. त्यासाठी त्यांनी डाऊनपेमेंट केले होते. कार खरेदी करण्यासाठी त्यांनी लोन घेतले होते. कार कृष्णा चौधरीच्या नावे घेण्यात आली होती.

Crime News
India’s Got Latent controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट' शोवर बंदी येणार? महिला आयोगाकडून कारवाईसाठी मोठं पाऊल

सुरुवातीला दोघे मिळून कारचे हप्ते भरत होते. मात्र, काही महिन्यात दोघांमध्ये वाद झाला .त्याची पार्टनर्शीप तुटली .त्यानंतर कारच्या लोनचे हप्ते कृष्णा भरत होता. कार रोहित राठोड वापरत होता. या गोष्टीवरुन कृष्णा याने रोहितला वारंवार हटकले.

Crime News
Sarang Sathye: रणवीर अलाहबादीया प्रकरणामुळे सारंग साठ्येचा 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे शो' गोत्यात; मनसेकडून शो बंदीचा इशारा

कारच्या लोनचा हप्ता मी भरताे. तर कार तू कशी चालविणार यावरुन दोघांमध्ये काल बुधावारी रात्री वाद झाला. या वादातून रोहित राठोड याने कृष्णा चौधरीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कृष्णा चौधरी जखमी झाला आहे. त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस रोहित राठोडचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com