Jammu Kashmir News: तब्बल ४३ वर्षांनंतर सापडला बलात्कार प्रकरणातील आरोपी, गुन्हा कबूल करण्यास दिला नकार

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील धारग्लुन गावातील हा आरोपी असून त्याच्यावर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध १९७९ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होतो
Jammu Kashmir News
Jammu Kashmir NewsSaam Digital
Published On

Jammu Kashmir News

बलात्काराच्या गुन्ह्यानंतर आखाती देशात फरार झालेल्या एका आरोपीला तब्बल ४३ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील धारग्लुन गावातील हा आरोपी असून त्याच्यावर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध १९७९ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होतो. अब्दुल खालिक (वय ६३) असं या आरोपीचं नाव आहे.

पूंछ सत्र न्यायालयाने अब्दुल खालिक (वय ६३) याच्या विरोधात १९९२ मध्ये अटक वॉरंटी जारी केले होते. त्यावेळी त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली होती. मात्र अब्दुल आखाती देशात फरार झाला होता. तिथे तो बरीच वर्षे मजूर म्हणून काम करत होता. मधल्या काळात त्याच्या साथीदाराने चुकीच्या पद्धतीने जामिनावर सुटका करून घेतली. दरम्यान अब्दुलचं गावं नियंत्रण रेषेजवळ असल्यामुळे तो अधून मधून आपल्या गावाला भेट देत होता.

अलीकडेच याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याची माहिती मिळाल्यांनतर रविवारी पोलिसांचं एक पथक अब्दुल खालिकच्या गावात दाखल झालं. पोलीस गावात पोहोचले तेव्हा तो त्याच्या शेतात गवत कापणाऱ्या मजुरांवर देखरेख करत होता. सुरुवातीला पोलिसांना पाहून तो गोंधळला आणि आपण ती व्यक्ती नसल्याचं सांगितलं. त्याच्या नातेवाईकांनीही पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यांनतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती मेंढर पोलीस स्थानकाचे एसएचओ साजिद बनिया यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jammu Kashmir News
Uttar Pradesh News: मुलाचा मृतदेह पाहताच वडिलांनीही सोडला जीव; मन सुन्न करणाऱ्या घटनेनं अख्खं गाव हळहळलं

पूंछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विनय शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यांनंतर जिल्हा पोलिसांनी खून, बलात्कार आणि दहशतवादी प्रकरणांमधील फरार गुन्हेगारांना अटक करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यांनी सर्व स्टेशन हाऊस अधिकाऱ्यांना, अशा गुन्हेगारांची यादी तयार करून लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बारामुल्ला, कुपवाडा आणि केंद्रशासित भागात अनेक पथके पाठविण्यात आली होती. या मोहिमेत मे पासून आतापर्यंत जवळपास ५८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Jammu Kashmir News
Debu Khan News: लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com