Jalgaon News : १५ ते २० अर्धनग्न तरुणांचा महामार्गावर धूडगूस; तलवारी दाखवत वाहनांवर दगडफेक

Jalgaon to Chhatrapati Sambhajinagar Highway: जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर 15 ते 20 अर्धनग्न तरुणांनी हातात तलवारी घेत वाहनांवर दगडफेक केलीय. यात अनेक वाहनांच्या काचा फुटल्या आहेत.
 Jalgaon to Chhatrapati Sambhajinagar Highway
Stone Pelting On Vehicles At Jalgaon Gadegaon Highway Saam tv
Published On

संजय जाधव, साम प्रतिनिधी

जळगावच्या गाडेगाव येथील महामार्गावर 15 ते 20 अर्धनग्न तरुणांनी गाड्या अडवून त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गाडेगावात असलेल्या सुप्रीम कंपनी जवळ ही घटना घडली. या हल्ल्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

 Jalgaon to Chhatrapati Sambhajinagar Highway
Nashik Crime : नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूची हत्या? नशेखोराच्या हल्ल्यात साधूचा मृत्यू; CCTV समोर

या घटनेत 15 ते 20 अर्धनग्न तरुण हातात तलवारी घेतल्या होत्या. या तरुणांनी अंडी आणि दगडफेक करत गाड्यांवर हल्ला केला. यात अनेक वाहनांचे काचा फुटल्या असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिक तसेच महिलांनी दिली. याबाबत रस्त्यावरून याबाबत या महामार्गावरून जात असलेल्या काही नागरिकांनी पोलिसात तक्रार देत कारवाईची मागणी केलीय. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 Jalgaon to Chhatrapati Sambhajinagar Highway
Viral Video: कराडची सुपर आजीं; ट्रॅफिकमधून रीक्षा चालवतेय बुंगाट; पाहा व्हिडिओ

प्रथमदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० तरुण सुप्रीम कंपनीच्या पुढे दबा धरून बसले होते. महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्यावर त्यांनी दगडफेक केली. तर काही गाड्यांवर अंडी फेकली. यात वाहनांचे नुकसान झाले आहे. प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com