Husband-Wife: पतीला मारून टाका,५०,००० रुपये मिळतील; नवऱ्याला मारण्यासाठी बायकोने व्हॉट्स अ‍ॅपवर दिली सुपारी

Uttar Pradesh Crime : आग्रामधील एका पत्नीने आपल्या पतीला ठार मारण्यासाठी व्हॉट्सअॅपवर सुपारी दिल्याची घटना समोर आलीय. माझ्या इच्छेविरुद्ध माझं लग्न झालंय.नवऱ्याला मारणाऱ्याला ५० हजार रुपये मिळतील, असं व्हॉट्स अ‍ॅपवर स्टेट्स ठेवत महिलेने तिच्या नवऱ्याला मारण्याची सुपारी दिलीय.
Uttar Pradesh Crime
Uttar Pradesh Crime

Husband-Wife Dispute Uttar Pradesh Crime:

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय. वाद झाल्यानंतर पत्नीने आपल्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिलीय. विशेष म्हणजे नवऱ्याच्या हत्येची सुपारी व्हट्स अ‍ॅपवर स्टेट्स ठेवत दिलीय. जो कोणी नवऱ्याची हत्या करेल त्याला ५०,००० हजार रुपयांचे बक्षीस मिळेल असं या महिलेने आपल्या स्टेट्समध्ये म्हटलंय. बायकोने तिच्या मोबाईलवर ठेवलेलं स्टेटस नवऱ्याला दिसलं, त्यानंतर धास्तावलेल्या पतीने पोलीस गाठलं आणि जीव वाचवण्याची विनवणी करू लागला.(Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना आग्रामधील बाह पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात घडलीय.दरम्यान तक्रारदार पतीने पत्नीच्या मित्राविरुद्धातही तक्रार दिलीय.पत्नीच्या मित्रानेही त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं त्याने आपल्या तक्रारीत म्हटलंय. तक्रार करणाऱ्या व्यक्तीचा ९ जुलै २०२२ रोजी मध्य प्रदेशमधील भिडे जिल्ह्यातील एका तरुणीशी विवाह झाला होता.परंतु लग्न करून हे दोघेही आनंदी नव्हते. या दोघांमध्ये सतत भांडणे होत होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचदरम्यान या व्यक्तीची बायको माहेरी गेली. त्यानंतर तिने घटस्फोटाची खटला दाखल केला.पीडित व्यक्ती २१ डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयाची तारीख पूर्ण करून घरी जात असताना त्याला सासरकडील लोकांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी पत्नी थेट व्हॉट्सअॅपच्या स्टेटेसवर पतीला मारण्याची सुपारी दिली. माझ्या इच्छेविरुद्धात माझं लग्न झालंय. जो कोणी माझ्या नवऱ्याला मारून टाकेन त्याला ५० हजार रुपये बक्षीस म्हणून मिळतील, असं या महिलेने आपल्या स्टेट्समध्ये ठेवलंय.

या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस म्हणाले, तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ च्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पीडितेची पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाणार आहे.

Uttar Pradesh Crime
Pune Crime News: पुण्यात चाललयं काय? देशी दारुच्या दुकानात राडा, डोक्यात फोडल्या बाटल्या; धक्कादायक CCTV समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com