Haryana Crime News: शिक्षकच ठरला हैवान! मुख्याध्यापकाने १४२ मुलींचा केला लैंगिक छळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Haryana Crime News: शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना हरियाणामध्ये घडली आहे. याठिकाणी एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने तब्बल १४२ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Haryana Crime News
Haryana Crime NewsSaam Tv
Published On

A Priciple Assaulted Students In Haryana:

शिक्षक आपल्याला आयुष्यामध्ये प्रगतीचा मार्ग दाखवण्याचे काम करतात. एक चांगला विद्यार्थी घडावा यासाठी शिक्षक दिवस-रात्र मेहनत करतात. शिक्षकांना आपण देवाचे स्थान देतो. आई-वडिलांनंतर आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. पण हेच शिक्षक कधी-कधी असं काही करून जातात की त्यावर आपला विश्वास ठेवणं कठीण जातं.

याच घटनेचा प्रत्यय हरियाणामध्ये आला आहे. याठिकाणी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने तब्बल १४२ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने हरियाणामध्ये खळबळ उडाली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, हरियाणातील जिंद जिल्ह्यामधील सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. १४२ विद्यार्थिनींनी या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात आरोप केले आहेत. मुख्याध्यापकाने तब्बल ६ वर्षांपासून लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. '५५ वर्षीय मुख्याध्यापकाने मुलींना ऑफिसमध्ये बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केले', असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी सांगितले.

एका रिपोर्टनुसार, बुधवारी जिंद जिल्ह्याचे उपायुक्त मोहम्मद इम्रान रझा यांनी यासंबंधित माहिती दिली. उपविभागीय दंडाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तपास समितीने ३९० विद्यार्थिनींची साक्ष नोंदवली होती. त्यातील १४२ विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाविरोधात तक्रार नोंदवली. १४२ विद्यार्थिनींपैकी अनेक विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांवर लैंगिक छळाचा आरोप केला. तर इतर विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाने केलेल्या घाणेरड्या कृत्याचे साक्षीदार असल्याचे सांगितले.

Haryana Crime News
Crime News: पतीच्या डोक्यात संशयरूपी हैवान शिरला, जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य

या घटनेतील आरोपी मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली. यासंदर्भात १५ पीडित मुलींनी ३१ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि राष्ट्रीय महिला आयोगाला यासंदर्भात पत्र लिहले होते. १३ सप्टेंबर रोजी हरियाणा महिला आयोगाने या पत्रांची दखल घेतली. त्यांनी १४ सप्टेंबर रोजी जिंद पोलिसांना याप्रकरणी कारवाई करण्यास सांगितले.

या प्रकरणात पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेतल्यानंतरही बऱ्याच दिवसांनी ३० ऑक्टोबर रोज गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीला ४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्याला ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर न्यायालयाने मुख्याध्यापकाची रवानगी न्यायालयीन कोठडी केली. याप्रकरणी महिला आयोगाने माहिती देताना सांगितले की, 'सरकारी शाळेतील ६० मुलींनी मुख्याध्यापकांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर आता एकूण १४२ मुलींनी मुख्याध्यापकांविरोधात तक्रार केली आहे.'

Haryana Crime News
Pune Crime News: झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या, पुण्यातील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com