Crime: विम्याच्या पैशांसाठी आई-वडील आणि बायकोची हत्या, तिहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने आई-वडील आणि बायकोची हत्या केली. विम्याच्या पैशांसाठी त्याने हे भयंकर कृत्य केले. या तिहेरी हत्याकांडाने उत्तर प्रदेश हादरले आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसही चक्रावले.
Crime: विम्याच्या पैशांसाठी आई-वडील आणि बायकोची हत्या, तिहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशच्या हापूरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आई-वडिलांची आणि बायकोची हत्या केली. विम्याचे पैसे मिळावे यासाठी त्याने हे भयंकर कृत्य केले. तिघांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये झाल्याचे खोटे कारण सांगून आरोपीने विमा कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये घेतले. याप्रकरणी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीने हापूर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. ही संपूर्ण घटना सुनियोजित कट रचून कल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Crime: विम्याच्या पैशांसाठी आई-वडील आणि बायकोची हत्या, तिहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले
Crime: चिकन खाण्यासाठी हट्ट, संतापलेल्या आईने मुलाच्या डोक्यात लाटणं मारलं; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

हापूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मित्रांच्या मदतीने आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये झाला असल्याचे सांगितले. २०१७ मध्ये त्याने आईची हत्या केली आणि तिच्या नावावर एका विमा कंपनीकडून २२ लाख रुपयांचा विमा क्लेम वसूल केला. एका वर्षापूर्वी त्याने वडिलांची हत्या केली आणि विमा कंपन्यांकडून ३९ कोटी रुपयांचा क्लेम केला. एका कंपनीने त्याला दीड कोटी रुपये देखील दिले. पण निवा बूपा हेल्थ इन्श्यूरन्स कंपनीने पैसे देण्यापूर्वी तापस सुरू केला. तपासातून समोर आले की, आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी ५० पेक्षा जास्त विमा केले होते.

Crime: विम्याच्या पैशांसाठी आई-वडील आणि बायकोची हत्या, तिहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले
Crime: लग्नाला नकार दिल्याचा राग तरुणीच्या डोक्यात गेला, बॉयफ्रेंडच्या डोक्यात रॉड घालून जागीच संपवलं

कंपनीने खोलात जाऊन तपास केला तर गेल्या ८ वर्षांत त्याची बायको आणि आई-वडील यांचा मृत्यू वेगवेगळ्या घटनांमध्ये झाल्याचे त्याने दाखवले. त्यानंतर संशय आणखी वाढला. कंपनीने आरोपीच्या वडिलांची पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि रुग्णालयाचा रेकॉर्ड मागवला. दोन्ही रिपोर्टमध्ये जे मृत्यूचे कारण लिहिले होते ते वेगवेगळे होते. यानंतर कंपनीने हापूर पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली.

Crime: विम्याच्या पैशांसाठी आई-वडील आणि बायकोची हत्या, तिहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले
Crime News : सतत फोनवर बोलायची, प्रेमसंबंधांचा संशय; जन्मदात्याकडून मुलीची हत्या, भावाचाही हात असल्याचे उघड

पोलिसांनी रविवारी आरोपी विशाल सिंघल आणि त्याच्या मित्राला अटक केली. दोन्ही आरोपी मेरठचे राहणारे आहेत. मुख्य आरोपी विशालची कसून चौकशी सुरू आहे. त्याने आई-वडिलांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. आता पोलिस त्याच्या बायकोच्या मृ्त्यूचा देखील तपास करत आहेत. कारण बायकोच्या मृत्यूनंतरही आरोपीने विमा कंपनीकडून ८० लाख रुपये घेतले होते. आरोपीचे वडील मुकेश सिंघल यांनी निवा बुपा, टाटा एआयजी, मॅक्स लाईफ, टाटा एआयए, आदित्य बिर्ला आणि एचडीएफसी एर्गो यासारख्या अनेक विमा कंपन्यांच्या पॉलिसी घेतल्या होत्या ही माहिती समोर आली.

Crime: विम्याच्या पैशांसाठी आई-वडील आणि बायकोची हत्या, तिहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले
Mumbai Crime : स्विमिंग पूलमध्ये अल्पवयीन २ मुलींवर लैंगिक अत्याचार, दादरमधील धक्कादायक घटना

मेरठमधील गंगानगर येथील रहिवासी मुकेश सिंघल हे फोटोग्राफर होते. त्यांचा मेरठ बाजारात एक फोटो स्टुडिओ होता. त्यांची बायको प्रभा देवी गृहिणी होती. त्यांचा एकुलता एक मुलगा विशाल आहे. एफआयआरनुसार, २०२४ मध्ये आरोपीने ३९ कोटी रुपयांचा विम्यासाठी दावा दाखल केला. त्यात म्हटले होते की त्यांचे वडील मुकेश सिंघल यांचे अपघातात निधन झाले. २७ मार्च २०२४ रोजी दुपारी गढ गंगा येथून परतत असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

Crime: विम्याच्या पैशांसाठी आई-वडील आणि बायकोची हत्या, तिहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले
Nanded Crime : गरबा चालवण्यासाठी हप्त्याची मागणी करत तलवारीने मारहाण; तिघांना घेतले ताब्यात

विम्याची रक्कम वितरित करण्यापूर्वी कंपनीने चौकशी सुरू केली. आठ वर्षांच्या आत त्याची बायको, आई आणि वडील मरण पावल्याचे उघड झाले. त्याची पत्नी २०१६ मध्ये आणि त्याची आई २०१७ मध्ये मरण पावली. त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्यूसाठी ८ लाख आणि आईच्या मृत्यूसाठी २२ लाख रुपये मिळाले. त्यानंतर कंपनीने सखोल चौकशी सुरू केली. आरोपीने त्याच्या दाव्यात म्हटले होते की त्याची पत्नी आणि आईचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे.

Crime: विम्याच्या पैशांसाठी आई-वडील आणि बायकोची हत्या, तिहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले
Crime News: बॉक्सर मेरी कोमच्या घरी चोरी, ३ अल्पवयीन मुलांना अटक; चोरीस गेलेल्या वस्तू जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com