Ganapath Gaikwad: आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी भाजप पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात; सूत्रांची माहिती

Ganapath Gaikwad Case Update: भाजप पदाधिकारी विकी गणात्रा याला देखील ठाणे खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड अद्याप फरार आहे.
Ganapath Gaikwad
Ganapath GaikwadSaam TV
Published On

अभिजित देशमुख

Ganapath Gaikwad News:

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप पदाधिकारी विकी गणात्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीये. गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिसांसमोर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांच्या तपासाला आता वेग आला आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी गणपत गायकवाड यांना तातडीने अटक केली होती. त्यांच्यासह तेथे उपस्थित अन्य कार्यकर्त्यांना देखील त्याचवेळी अटक करण्यात आली. त्यानंतर आता आणखी एका भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये गणपत गायकवाड यांच्यासह संदीप सरवनकर, हर्षल केने यांना अटक करण्यात आली होती. तसेच गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड, विकी गणात्रा, नागेश बडेकर हे तीन जण फरार होते.

अशात आता व्यावसायिक व भाजप पदाधिकारी विकी गणात्रा याला देखील ठाणे खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय, अशी माहिची सूत्रांकडून मिळाली आहे. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि साथीदार नागेश बडेकर हे दोघे अद्याप फरार असून ठाणे क्राइम ब्रांच विविध पथक या दोघांचा शोध घेत आहेत.

भाजप कार्यकर्त्यांना मीडियासमोर प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात कार्यकर्त्यांना एक तंबी देण्यात आली आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी मीडिया अथवा सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देऊ नये,अशी तांबी पक्षातर्फे तसेच पोलिसांकडून सुद्धा देण्यात आल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते.

तसेच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी शिंदे गटाच्या एका मोठ्या नेत्यास विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, सुखाचे दिवस दु:खात का घालवावे असं म्हटलंय, मात्र या प्रकरणानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते प्रचंड दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे.

Ganapath Gaikwad
Kalyan Crime: कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या लिपिकासह निवृत्त कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक; एसीबीने रंगेहाथ पकडले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com