Karad : जास्त बोलते म्हणून नवऱ्याने बायकोचा गळा दाबला, संसाराची राखरांगोळी झाली

Karad Local Crime News : सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून नवऱ्याने बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना कराडमध्ये घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हॉटेलमध्ये राहत होते. आरीपोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

संभाजी थोरात, साम टीव्ही प्रतिनिधी

karad crime news : सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून नवऱ्याने बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना कराडमध्ये घडली आहे. जास्त बोलत असल्यामुळे नवऱ्याने बायकोचा गळा दाबून काटा काढल्याच्या घटनेनं कराड हादरले. मयुरी कणसे असे 27 वर्षीय मृत्यू झालेल्या पत्नीचे नांव आहे. पत्नीचा खून करणाऱ्या पतीस कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. पत्नीचा मृतदेह शवच्छेदनासाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद विशाल सदाशिव कणसे यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुर यशवंत कणसे (वय-30) याचे लग्न सन 2018 साली झाले. लग्नाच्या एका वर्षानंतर चुलत भावाची पत्नी मयुरी हिचे त्यांचे घरातील लोकांसोबत घरगुती कारणावरून पटत नसल्याने व नेहमी वाद होत असल्याने तो गेले चार महिन्यापासून त्याची पत्नी व मुलासह विंग हॉटेल फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. बुधवारी रात्री 11.00 वाजताच्या सुमारास मयुर यशवंत कणसे याने फोन करून सांगितले की, मयुरी लयच बोलायला लागली, म्हणून मी तिचे नरडे दाबले. मयुर याने, मयुरी लयच बोलायला लागल्याने मी तिचा गळा दाबून खून केला आहे असे सांगितले.

मी व मयुरचा भाऊ महेश आम्ही मयुरीला आवाज देवून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिची काही हालचाल दिसत नव्हती. त्यावेळी मी आमचे गावातील काही जणांच्या मदतीने माझी चुलत भावजय मयुरी हिस खाजगी स्विफ्ट गाडीने कॉटेज हॉस्पिटल कराड येथे उपचाराला घेवून आलो. त्यावेळेस तेथील डॉक्टरांनी तपासले असता मयुरी ही उपचारापूर्वीच मयत झालेचे सांगितले. अशी फिर्याद संशयित आरोपी मयूर कणसे याच्या चुलत भावाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com