Crime News : ३ वर्षापासून लिव्ह इनमध्ये, क्षुल्लक कारणावरुन गर्लफ्रेंडला संपवून बॉयफ्रेंड फरार; डोंबिवलीतील 'त्या' हत्याप्रकरणाचा उलगडा

Dombivli Murder Young Woman : ठाकुर्ली येथे राहणाऱ्या सुभाष भोईर याचे मयत तरुणीशी प्रेमसंबंध होते. यातूनच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.
Dombivli building young woman killed case has been solved
Dombivli building young woman killed case has been solvedSaam Tv News
Published On

ठाणे : डोंबिवली टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ तारखेला असलेल्या एका इमारतीमधील घरात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला तर, काल या मयत तरुणीच्या नातेवाईकांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण क्राईम ब्रांचने हल्लेखोर तिचा प्रियकर सुभाष भोईर याला कल्याण दुर्गाडी पुलाच्या परिसरातून बेड्या ठोकल्या. सुभाष भोईर हा या तरुणीसोबत गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. याच वादातून सुभाषने तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि तेथून पळ काढला. अखेर काल गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने अवघ्या २० तासात सुभाष भोईरला बेड्या ठोकल्या आहेत.

ठाकुर्ली येथे राहणाऱ्या सुभाष भोईर याचे मयत तरुणीशी प्रेमसंबंध होते. यातूनच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन वर्षापासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. २२ एप्रिलला या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या सुभाष भोईर याने या तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली, त्यानंतर त्याने घरातून पळ काढला.

Dombivli building young woman killed case has been solved
Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना, केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय; सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया

घरात तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. टिळक नगर पोलिसांनी या प्रकरणी ए.डी.आर दाखल करत पुढील तपास सुरू केला. मात्र, आठवडाभराने मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी या तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला. कल्याण क्राईम ब्रँच देखील या प्रकरणी समांतर तपास करत होती. या तरुणीचा प्रियकर सुभाष भोईर याच्यावर कल्याण क्राईम ब्रांचला संशय होता. मात्र, सुभाष भोईर पसार झाला होता, अखेर तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुभाष भोईर हा कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी पुलाजवळ असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचने दुर्गाडी किल्ला परिसरात सापळा रचत सुभाष भोईर याला बेड्या ठोकल्या. सुभाष भोईर हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच कल्याण क्राईम ब्रँच पथकाने त्याला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Dombivli building young woman killed case has been solved
Cast Census : PM मोदींनी विरोधकांच्या हातातून महत्वाचा मुद्दा हिसकावला; जातनिहाय जनगणनेचा कुणाला फायदा अन् कुणाचं नुकसान?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com