प्रेमसंबंधामध्ये अडथळा, आईच्या साथीनं नवऱ्यानं डोक्यावर वार केला, पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन बायकोची हत्या; महाराष्ट्र हादरला

Dhule Crime News : कपिल बाळू बागूल असं आरोपी पतीचं नाव आहे, तर पूजा कपिल बागुल असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. २०१० साली कपिल आणि पूजाचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.
Dhule pesticide injection kills wife
Dhule pesticide injection kills wifeSaam Tv News
Published On

भूषण अहिरे, साम टिव्ही

धुळे : धुळ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीची हत्या करताना क्रूरतेची सीमा ओलांडत पत्नीची हत्या केली आहे. मारेकरी पतीने पेस्टिसाईडचं इंजेक्शन देऊन प्रेम संबंधामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पत्नीची क्रूरतेची सीमा गाठत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्याच्या वलवाडी येथे उघडकीस आला आहे. पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून त्यानंतर तिचे हातपाय दाबून तिला पेस्टिसाइडचं इंजेक्शन दिलं, आणि यासाठी आपल्या क्रूर मुलाची साथ त्याच्या आईने देखील देत सुनेला मारण्यास मदत केली आहे.

कपिल बाळू बागूल असं आरोपी पतीचं नाव आहे, तर पूजा कपिल बागूल असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. २०१० साली कपिल आणि पूजाचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.

Dhule pesticide injection kills wife
Mumbai Shocking : मुंबईत २१ मजली इमारतीची कार लिफ्ट कोसळली; एकाचा जागीच मृत्यू

कॉलेजमध्ये सोबत असलेल्या प्रज्ञासोबत कपिलचे प्रेमसंबंध होत. त्यानंतर प्रज्ञाचे दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न झालं आणि कपिलचं देखील त्यानंतर लग्न झालं. परंतु काही वर्षांपूर्वी पुन्हा एकदा प्रज्ञा आणि कपिलची भेट झाली. कपिल आणि प्रज्ञा यांच्यामध्ये पुन्हा प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर प्रज्ञाने आपल्या पतीला सोडचिठ्ठी देत कपिलसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तसाच कपिलकडे हट्ट देखील केला, कपिलने देखील आपल्या पत्नीला आपल्या विवाहबाह्य प्रेमसंबंध संदर्भात काही माहिती झालं असल्याचं जाणवताच तिला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाला पत्नी पूजाने नकार दिला.

अखेर कपिलने आपल्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पत्नी पूजाला पूर्णतः संपवण्याचा निर्णय घेतला. कपिलने पत्नी पूजाला पेस्टिसाइडचं इंजेक्शन देत अखेर संपवलं. विशेष म्हणजे त्यामध्ये कपिलच्या आईने देखील त्याची साथ दिली, आधी पूजाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आला व त्यानंतर तिला पकडून जबरदस्तीने पेस्टिसाइडचं इंजेक्शन दिलं. एवढंच नव्हे तर तब्बल दीड ते पावणे दोनतास नराधम पती कपिल आपली पत्नी मरेपर्यंत त्या जागेहून हलला देखील नाही. आपल्या पत्नीला तडफडत मरताना तो उघड्या डोळ्यांनी बघत होता.

Dhule pesticide injection kills wife
Buldhana Crime : बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती?; BJP कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या तोंडातून फेस यायला लागला आणि त्यानंतर पत्नी मेल्याची खात्री झाल्यानंतर मारेकरी पतीने तिला खासगी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी पूजाचा मृत्यू झाला असल्याची माहिती देताच मारेकरी पतीने मृतदेह आपल्या घरी आणला त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना मारेकरी पतीनेच फोन करून पूजाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असल्याची माहिती कळवली. त्यांच्या येण्यापूर्वीच तिच्या अंत्यविधीची देखील तयारी पूर्ण केली.

परंतु तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ धाव घेत तिचा अंत्यविधी होण्यापूर्वीच धुळे गाठले व पश्चिम देवपूर पोलिसांच्या मदतीने अंत्यविधी थांबवण्यात आला. त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, आणि मारेकरी पतीसोबत, या क्रूर कृत्यात आपल्या मुलाची साथ देणाऱ्या आईला त्याचबरोबर बहिणीला तसेच प्रियसी प्रज्ञाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पश्चिम देवपूर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

Dhule pesticide injection kills wife
Beed Crime News: आणखीन पैसे दे अन्यथा तुला..; सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्यानं जीवन संपवलं, बीडमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com