धुळ्यात नाल्यात अज्ञात मृतदेह आढळला
फागणे गावाच्या हद्दीत सकाळी घटना उघडकीस आली
पोलीस तपास सुरू, मृत्यूचे कारण अस्पष्ट
मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवणार
धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतशिवराजवळील एका नाल्यात नागरिकांना एक अज्ञात मृतदेह आढळून आला. या घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. सदर घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.
धुळे शहरालगत असलेल्या पारोळा रोडवरील फागणे गावाच्या हद्दीत, आज सकाळी परिसरातील काही नागरिक या भागातून पुलावरून जात असताना त्यांना नाल्यात एक मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने फागणे आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले.
अद्याप संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून, पोलिसांनी पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली आहे. हा घातपात आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून केला जात असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.