Dhule Crime: देवपूर पोलिसांकडून घरफोडीच्या गुन्ह्यात दोघांना अटक; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Dhule Breaking News: धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरपोडी गुन्ह्याचा छडा लावत देवपूर पोलिसांनी दोघा सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Thane Crime News
Thane Crime News Saam Digital

Dhule Crime News:

धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरपोडी गुन्ह्याचा छडा लावत देवपूर पोलिसांनी दोघा सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे (Dhule) शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मी नगर येथून सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी घरफोडी झाल्याची तक्रार देवपूर पोलीस ठाण्यात दाखल होती. या घरफोडी दरम्यान चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिन्यांसह जवळपास 3 लाख 90 हजार 782 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता.

देवपूर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या गुन्ह्याची उकल केली असून परभणी येथील दोघा सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच या कारवाईत त्यांच्याकडून जवळपास 4 लाख 52 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींकडून जप्त केलेल्या साहित्यामध्ये विविध प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने आहेत. या प्रकर देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. (Crime News In Marathi)

Thane Crime News
Latur Politics : लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनेचा भाजपमध्ये प्रवेश

अकोल्यात मोटारसायकल टोळीचा म्होरक्या अटकेत.

दरम्यान, अकोल्यात मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली आहे. या टोळीचा म्होरक्या शरद अशोक सहारे याला अटक केली आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली असून त्याच्याकडून तीन मोटरसायकलसह एक लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Thane Crime News
Latur Politics : लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनेचा भाजपमध्ये प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com