Crime News: दुकानाच्या आतमध्ये मुलीवर होत होता गँगरेप, अचानक आई पोहचली अन्...

13 Years Minor Girl physically Assaulted: १३ वर्षांच्या मुलीवर ३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना पोलिसांनी अटक केली.
Crime News: दुकानाच्या आतमध्ये मुलीवर होत होता गँगरेप, अचानक आई पोहचली अन्...
Madhya Pradesh Crime Saam Tv
Published On

मध्य प्रदेशमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या अलिराजपूर जिल्ह्यातील बोरकुआन गावात ही घटना घडली. तीन जणांनी दुकानामध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईच्या दुकानामध्येच ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. त्याचसोबत आरोपींना मदत करणाऱ्या इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांनाही अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरकुआ येथील रहिवासी असलेल्या १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री घडली. पीडित मुलगी सहावीमध्ये शिकते. परीक्षा देऊन ती आईसोबत घरी आली होती. याचदरम्यान बोरकुआन येथील पटेल फलिया येथे राहणारा अजमेर रावत दुचाकीवरून पिडीत मुलीच्या घरी आला आणि त्याने पीडित मुलगी आणि तिच्या आईला त्याच्यासोबत गावात येण्यास सांगितले. अजमेरने सांगितल्याप्रमाणे पीडित मुलगी आणि तिची आई दुचाकीवरून त्याच्यासोबत गेली.

Crime News: दुकानाच्या आतमध्ये मुलीवर होत होता गँगरेप, अचानक आई पोहचली अन्...
Pune Crime : शर्ट फाडला, लाथा बुक्क्यांनी मारहाण, अपहरण करुन घाटात नेलं; दत्ता गाडेच्या वकिलावर जीवघेणा हल्ला

काही वेळानंतर अजमेरने या दोघींना त्यांच्या दुकानावर आणून सोडले. पीडित मुलीची आई दुकानाच्या मागे असलेल्या तिच्या घरी निघून गेली. मुलगी दुकानावरच बसली होती. त्यावेळी अजमेरने त्याचे चार मित्र राहुल रावत, अरविंद रावत, नीलेश रावत आणि राकेश रावत यांना बोलावून घेतले. दोन आरोपी दुकानाबाहेर दुचाकीवर बसून पहारा देत असताना तीन जणांनी दुकानामध्ये घुसून मुलीला धमकावले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Crime News: दुकानाच्या आतमध्ये मुलीवर होत होता गँगरेप, अचानक आई पोहचली अन्...
Pune Crime: दोन हजार रुपयांसाठी ब्लॅकमेलिंगचा प्रकार! सोशल मीडियावर महिलेचा नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी

दुकानामध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार होत असताना अचानक पीडितेची आई तिथे पोहचली. आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार पाहून तिला मोठा धक्का बसला. तिने तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तोपर्यंत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांत सर्व आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.

Crime News: दुकानाच्या आतमध्ये मुलीवर होत होता गँगरेप, अचानक आई पोहचली अन्...
Pune Crime : हे आश्रम आहे का? उपचाराधीन रुग्णाला जबरदस्ती डिस्चार्ज, तीन दिवसांनी पेशंटचा...

अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रदीप पटेल यांनी सांगितले की, सर्व आरोपींवर पोक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनीही ट्वीट करून राज्य सरकार आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर हल्लाबोल केला आहे. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Crime News: दुकानाच्या आतमध्ये मुलीवर होत होता गँगरेप, अचानक आई पोहचली अन्...
Pune Crime : ठेकेदाराकडून अशिक्षित महिलांच्या बोगस सह्या, प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा घोटाळा; पुण्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com