Pune Crime : हे आश्रम आहे का? उपचाराधीन रुग्णाला जबरदस्ती डिस्चार्ज, तीन दिवसांनी पेशंटचा...

Pune Crime News : रुग्णासोबतचा नातेवाईक त्यांना समजवून सांगत आहे की, पायाला सुज आहे. पण डॉक्टर म्हणताय की, हे आश्रम आहे का? दोन दिवसच आम्ही रुग्णाला ठेवतो. जास्त दिवस आम्ही पेशंटला इथे ठेवत नाही.
Doctor forcibly discharges patient undergoing treatment
Doctor forcibly discharges patient undergoing treatmentSaam Tv News
Published On

सागर आव्हाड

पुणे : सकाळी माझी शुगर ३१ इतकी खाली आली होती. त्‍यामुळे मला चालताही येत नव्‍हते. माझे पाय सूजलेले आहेत. घरी मी एकटा राहतो. काळजी घेणारे कोणी नाही. मला आणखी काही दिवस येथे उपचारासाठी राहूद्या, अशा शब्‍दात आर्जव करणाऱ्या रुग्‍ण आणि नातेवाइकांचा औंध जिल्‍हा रुग्‍णालयातील डॉक्‍टरला पाझर तर फुटला नाही. उलट तू बरा झाला आहेस ‘हे काय आश्रम आहे का?’ असा अपमानित करणारा शब्‍दप्रयोग करत त्यांना रुग्‍णालयातून सुटी (डिस्‍चार्ज) घ्यायला लावला. दुर्दैवी बाब म्हणजे सुटी घेतल्यानंतर त्‍या रुग्‍णाचा तिसऱ्याच दिवशी घरी प्राणज्योत मालवली.

गिरीश मोरे (वय ४४, रा. येरवडा) असं या मृत पावलेल्या रुग्‍णाचं नाव आहे. रुग्‍णाला मरणाच्‍या दाढेतून बाहेर काढणाऱ्या डॉक्‍टरांची तुलना देव माणसासोबत केली जाते. परंतु, जिल्‍हा रुग्‍णालयातील उपचार करणारे डॉक्‍टर खरंच त्‍या माणुसकीला जागतात का? असा प्रश्‍न या निमित्ताने नातेवाइकांनी उपस्थित केला आहे.

Doctor forcibly discharges patient undergoing treatment
Uddhav Thackeray : गृहखातं झोपा काढत होतं का? नागपूर हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंनी थेट CM फडणवीसांना सुनावलं

हा प्रकार सुमारे सव्‍वा दोन महिन्‍यापूर्वी १० जानेवारीला घडला असून यामध्‍ये नातेवाइकांनी रुग्‍ण आणि डॉक्‍टरांसोबतचा संवाद रेकॉर्ड केला आहे. शुगरचा त्रास झाल्‍याने मोरे यांना जिल्‍हा रुग्‍णालयात ३ जानेवारीला पुरूषांच्‍या मेडिसिन या कक्षात उपचारासाठी दाखल केले होते. त्‍यांच्‍यावर फिजिशियन डॉ. अमोल बोंद्रे हे उपचार करत होते. त्‍यांनी रुग्‍णाचे ‘जुनाट व्‍यसनाधीनता व मधुमेह’ (क्रॉनिक अल्‍कोहोल ॲंड टाइप २ डायबेटिस) असे निदान केले. उपचारानंतर मोरे यांची शुगर नियंत्रणात आली.

परंतु, १० जानेवारीला ती नियोजित प्रमाणापेक्षा खूपच कमी म्‍हणजे ३१ झाली. पायांवरही सूज होती. त्‍यामुळे त्‍यांना चालताही येत नव्‍हते. दुसरीकडे डॉ. बोंद्रे हे त्‍यांना काही समस्‍या नसल्‍याचे सांगत सुटी घेण्‍याचा आग्रह करत असल्‍याचे दिसून येते. त्‍यावर रुग्‍ण आणि नातेवाईकही त्‍यांना बरे वाटत नसून आणखी काही दिवस राहूद्या, अशी विनंती करत असल्‍याचे व्हिडीओमध्‍ये दिसून येत आहे.

Doctor forcibly discharges patient undergoing treatment
मुलाला मारण्याची धमकी, आईला पळवून नेलं, आरोपींच्या घरावर जेसीबी चालवलं; अहिल्यानगरमध्ये काय घडतंय?

रुग्णासोबतचा नातेवाईक त्यांना समजावून सांगत आहे की, पायाला सुज आहे. पण डॉक्टर म्हणताय की, हे आश्रम आहे का? दोन दिवसच आम्ही रुग्णाला ठेवतो. जास्त दिवस आम्ही पेशंटला इथे ठेवत नाही. तुमचा पेशंट आता बरा आहे. पायाची सुज हळूहळू कमी होईल, त्याला वेळ लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. पण दुर्दैवाने त्या रुग्णाचा तीन दिवसांनी मृत्यू झाला.

Doctor forcibly discharges patient undergoing treatment
Pune Crime : ठेकेदाराकडून अशिक्षित महिलांच्या बोगस सह्या, प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा घोटाळा; पुण्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com