Crime: सोशल मीडियावरून मैत्री, हॉटेलवर बोलावलं; मुलीसोबत भयंकर घडलं

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने हॉटेलवर नेऊन बलात्कार केला. त्यानंतर हॉटेल ऑपरेटरने देखील तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले.
Crime: सोशल मीडियावरून मैत्री, हॉटेलवर बोलावलं; मुलीसोबत भयंकर घडलं
Uttar Pradesh Crime Saam Tv
Published On: 
  • उत्तर प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

  • सोशल मीडियावरून मैत्री झालेल्या तरुणाचं भयंकर कृत्य

  • हॉटेलवर बोलावून बलात्कार केला आणि तिथेच सोडून निघून गेला

  • त्यानंतर हॉटेल ऑपरेटरने देखील पीडितेवर बलात्कार केला

उत्तर प्रदेशमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावरून या मुलीची एका तरुणासोबत ओळख झाली होती. या तरुणाने पीडित मुलीला हॉटेलवर नेऊन तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. आधी तरुणाने पीडित मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर हॉटेल ऑपरेटरने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

आरोपी तरुणाने पीडित मुलीसोबत सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर त्याने तिला आमिष दाखवत हॉटेलवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी पीडित मुलीला तिथेच सोडून निघून गेला. त्यानंतर हॉटेल ऑपरेटरने अल्पवयीन मुलीला ओलीस ठेवले. त्यानंतर धमकावून तिच्यावर त्याने देखील बलात्कार केला. पीडित मुलगी कशीबशी त्याच्या तावडीतून निसटून पळून जाण्यात यशस्वी झाली.

Crime: सोशल मीडियावरून मैत्री, हॉटेलवर बोलावलं; मुलीसोबत भयंकर घडलं
Pune Crime: पुणे हादरले! शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या, प्रॉपर्टीसाठी आजोबानेच नातवाला संपवलं

पीडित मुलीने एका महिलेला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल ऑपरेटर आणि तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी घटना घडलेले हॉटेल देखील बंद केले.

Crime: सोशल मीडियावरून मैत्री, हॉटेलवर बोलावलं; मुलीसोबत भयंकर घडलं
Dombivli Crime : प्रेमाचं जाळं फेकलं, ब्लॅकमेलिंग, ७० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ, २२ वर्षांच्या तरुणाचा विकृत प्रकार

पोलिसांनी सांगितले की, बुलंदशहर जिल्ह्यातील एका गावात राहणारी पीडित मुलगी आठवीमध्ये शिकते. इल्यासपूर भागात राहणाऱ्या तरुणासोबत तिची सोशल मीडियावरून मैत्री झाली. दीड महिन्यांपासून ते एकमेकांना ओळखत होते. बुधवारी तरुणाने तिला फोन करून भेटायला बोलावले. त्याठिकाणावरून तो तिला एका हॉटेलवर घेऊन गेला आणि त्याठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला. आईचा फोन आला असून मी बाहेर फोनवर बोलता असे सांगून तो पीडितेला तिथेच सोडून निघून गेला. त्यानंतर भोपटपूर येथील रहिवासी असलेल्या हॉटेल ऑपरेटरने पीडितेला धमकावत तिच्यावर बलात्कार केला.

Crime: सोशल मीडियावरून मैत्री, हॉटेलवर बोलावलं; मुलीसोबत भयंकर घडलं
Crime: बायको प्रियकरासोबत पळाली, शुद्धीकरणाऱ्या नावाखाली सामूहिक बलात्कार; नवऱ्यासह ९ जणांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com