Pune News : शेकडो कोटींचा बँक घोटाळा, १७ वर्षांपासून वेषांतर करून चकवा; CID च्या जाळ्यात अडकला मोठा मासा

CID Raid In Telangana: महाराष्ट्र सीआयडीने तेलंगणा राज्यात मोठी छापेमारी केली आहे. या छापेमारीत त्यांनी नागपूरच्या बहुचर्चीत समता सहकारी बँकेतील घोटाळ्यातील आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.
 समता सहकारी बँकेतील घोटाळ्यातील आरोपी
CID Raid In TelanganaSaam Tv
Published On

नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे

महाराष्ट्र सीआयडीने तेलंगणा राज्यात मोठी छापेमारी केली आहे. या छापेमारीत त्यांनी नागपूरच्या बहुचर्चीत समता सहकारी बँकेतील घोटाळ्यातील आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. विजयकुमार रामचंद्र दायमा, असं सीआयडीने ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीने नागपूरच्या समता सहकारी बँकेत घोटाळा केल्याचा आरोप आहे.

आरोपी दायमाने नागपूरमधील समता बँकेत कोट्यावधी (Samata Co operative Bank Scam) रुपयांचा घोटाळा केला होता. त्यानंतर तो सतरा वर्षांपासून फरार होता. वेषांतर करून आरोपी दायमा वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत होता. तो पुणे, मुंबई, हैदराबाद आणि तेलंगणातील वेगवेगळ्या गावांमध्ये स्वतःची ओळख लपवूनन वेषांतर करून दायमा राहत होता. याची भनक महाराष्ट्र सीआयडीला लागली होती. त्यामुळे ते आरोपीच्या मागावर (Pune News) होते.

नागपूरच्या समता बँकेत १४५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी तब्बल ५७ पेक्षा अधिक आरोपीवर गुन्हा दाखल आहे. ⁠दायमा समता बँकेचा कर्जदार आहे. परंतु, आरोपी दायमाने कोणतेही तारण न देता बँकेतून कोट्यवधीचं कर्ज घेवून घोटाळा केला होता. १७ वर्षांपासून आरोपी दायमा हा वेशांतर करून पोलिसांना चकवा (CID Raid) देत होता. वेषांतर करून तो सतत शहरं बदलत होता. त्यामुळे आरोपीचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता.

 समता सहकारी बँकेतील घोटाळ्यातील आरोपी
Kanpur IT Raid: रोल्स रॉयस, फेरारीसह तब्बल १०० कोटींच्या गाड्या; तंबाखू कंपनीच्या मालकाकडे सापडला कुबेराचा खजिना

परंतु आरोपी तेलंगाना राज्यातील गायत्री नगर सुचित्र जेडी मेटला हैदराबाद या ठिकाणी लपून बसला होता. त्याची माहिती महाराष्ट्र सीआयडीला (CID Raid In Telangana) मिळाली होती. ⁠पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यांनी वेशांतर करून आरोपी दायमाला ताब्यात घेतलं. पण त्यावेळी आरोपी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. ⁠पोलिसांनी आरोपीला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेऊन नागपूर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

 समता सहकारी बँकेतील घोटाळ्यातील आरोपी
Jalana IT Raid: २० पथके, तब्बल १५० अधिकारी, अन् तीन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी; जालन्यात काय घडतयं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com