छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) गुन्हेगारीला चांगलंच खतपाणी मिळतंय. नुकतंच शहरात हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या तुषार राजपूतच्या टोळीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलंय. पुण्यातील कुख्यात लेडी डॉन कल्याणी देशपांडे हिला अटक करण्यात आली. त्यानंतर आता या टोळीवर शहर पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याची तयारी सुरू केली (Sambhajinagar Crime) आहे. (latest crime news in marathi)
यामध्ये आणखी आरोपींची संख्या वाढणार असल्याची माहिती मिळत आहे. 13 जानेवारीला सिडको पोलिसांनी शहरातील एका इमारती छापा मारून कुंटण खाण्याचा (Prostitution) पर्दाफाश केला होता. त्यांच्या चौकशीत कुख्यात तुषार राजपूतचं नाव समोर आलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
बीड बायपासच्या (Chhatrapati Sambhajinagar) सेनानगरातील बंगल्यातून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणात २० जानेवारीला मोठी कारवाई देखील केली आहे. वेश्या व्यवसायचालक (Prostitution) तुषार राजपूतसह बीड बायपासच्या बंगल्यातून पाच जणांना अटक केली होती. दिल्लीच्या दोन तरुणींसह एका विदेशी तरुणीची देखील पोलिसांनी सुटका केली होती.
या वेश्याव्यवसायाची पाळेमुळं शोधताना वेश्याव्यवसायाची सूत्रधार व आंतरराष्ट्रीय एजंट कल्याणीला छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक (Crime News) केली. त्यानंतर रात्री तिला सिडको पोलीस ठाण्यात रात्री हजर करण्यात आलं होतं.
कोण आहे कल्याणी देशपांडे
कल्याणी देशपांडेचं नाव २००० मध्ये पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर आलं. ती पुण्यातील टॉप दलाल आहे. व्हीनस एस्कॉर्ट्स नावाची एस्कॉर्ट् एजन्सी तिच्या बंगल्यातून चालवली जात होती. तिचा बंगला वेश्याव्यवसाय (Prostitution) आणि गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध आहे.
मोक्का म्हणजे काय
मोक्का हा 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा'आहे. तो २४ फेब्रुवारी १९९९ रोजी महाराष्ट्रात 'टाडा'ऐवजी हा लागू करण्यात आला. राज्यापुरताच हा कायदा मर्यादित आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी यापूर्वीही संघटित गुन्हेगारी प्रकरणात हा कायदा लागू केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.