Fraud News: मलकापूर बँकेला घातला ९ कोटींचा गंडा! भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांना अटक; काय आहे प्रकरण?

Malkapur Arban Bank Scam: भाजपा पदाधिकारी, जिल्हा बँकेचा संचालक अभिषेक जयस्वालसह दोघांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे.
Malkapur Arban Bank Scam:
Malkapur Arban Bank Scam: Saamtv

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता.२७ एप्रिल २०२४

छत्रपती संभाजीनगरमधील मलकापूर अर्बन बँकेत जमिनीची खोटे कागदपत्रे बनवून 9 कोटी रुपयांचे कर्ज लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भाजपा पदाधिकारी, जिल्हा बँकेचा संचालक अभिषेक जयस्वालसह दोघांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील मलकापूर अर्बन बँकेत जमिनीचे बनावट कागदपत्रे सादर करत चक्क ९ कोटी रुपये कर्ज काढण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अभिषेक जगदीश जयस्वाल आणि अमरीश जगदीश जयस्वाल या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

आरोपींपैकी अभिषेक जयस्वाल हा भाजपचा पदाधिकारी तसेच जिल्हा बँकेचा संचालक असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील समर्थ नगर मधल्या कोट्यावधीची जमीन विकत देण्यास मूळ मालकाने नकार दिल्यानंतर अभिषेक जयस्वाल यांनी त्याच जमिनीची खोटी कागदपत्रे तयार केली.

Malkapur Arban Bank Scam:
Buldhana News: ढग गडगडले, वारा सुटला अन् मतदान केंद्रावरील पत्रे उडाली; लोकांची पळापळ, निवडणूक अधिकारी जखमी

त्यानंतर रजिस्ट्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने बोगस खरेदी खत तयार करून मलकापूर अर्बन बँकेतून 9 कोटी रुपयांची कर्ज उचलून बँकेला चुना लावला. हे प्रकरण समोर आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Malkapur Arban Bank Scam:
Heat Wave Alert: महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; मुंबई, ठाण्यासह कोकण तापणार, IMD कडून अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com