Chhatrapati Sambhajinagar: टवाळखोर गुंडांचा हैदोस! किरकोळ वादातून भरचौकात तरुणावर तलवारीने वार; घटनेचा थरार CCTVत कैद

Maharashtra Breaking News: छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती आकाशवाणी चौकात किरकोळ वादातून तरुणांवर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar: टवाळखोर गुंडांचा हैदोस! किरकोळ वादातून भरचौकात तरुणावर तलवारीने वार; घटनेचा थरार CCTVत कैद
Maharashtra Breaking News: Saamtv
Published On

छत्रपती संभाजीनगर, ता. ४ जुलै २०२४

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खून, मारामारी, तलवारीने हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शहरातील सिडको बस स्थानक चौकात तरुणाने तलवार घेऊन धुडगूस घातला होता. अशातच आता शहरातील आकाशवाणी चौकात किरकोळ वादातून तलवारीने हल्ला करत राडा झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती आकाशवाणी चौकात किरकोळ वादातून तरुणांवर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कपिल नागोडे नावाचा तरुण आकाशवाणी चौकापासून काही अंतरावर नागरिकांना शिवीगाळ करून आरडाओरड करत होता.

यावेळी नागरिक सोमनाथ देवकाते यांनी त्याला तसे गोंधळ न घालण्याचे सांगत समज दिली. त्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास देवकाते आकाशवाणी चौकात भाच्यासह फिरत होते. त्याच वेळी कपिल, प्रामाणिक सोनवणे यांनी लाकडी दांडा काढून त्यांच्यावर हल्ला चढवला. कपिलने तलवार काढून हवेत फिरवली. सोमनाथ यांना डोके, हाताला गंभीर दुखापत झाली.

Chhatrapati Sambhajinagar: टवाळखोर गुंडांचा हैदोस! किरकोळ वादातून भरचौकात तरुणावर तलवारीने वार; घटनेचा थरार CCTVत कैद
Pune News: अरविंद शिंदेंना 'ते' वक्तव्य भोवणार? पुण्यात भाजप- काँग्रेस पक्ष आमने-सामने!

दरम्यान, स्थानिकांनी धाव घेईपर्यंत दोघांनी कारमधून पळ काढला. मात्र हा सगळा हल्ला सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच भरचौकात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे की नाही? असा सवाल आता उपस्थित आहे.

Chhatrapati Sambhajinagar: टवाळखोर गुंडांचा हैदोस! किरकोळ वादातून भरचौकात तरुणावर तलवारीने वार; घटनेचा थरार CCTVत कैद
VIDEO: 'बजेटवरुन टीकास्त्र, भ्रष्टाचाराचे आरोप, अन् विकासाचा मुद्दा' अजित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका; विरोधकांना सुनावलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com