
छत्रपती संभाजीनगरमधील वाळुजमध्ये पडलेल्या मोठ्या दरोड्याच्या घटनेतील संशयित आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. अमोल खोतकरचा जाणूनबुजून एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप खोतकरची बहीण रोहिणी खोतकरने आरोप केला होता. आता या प्रकरणात मोठी अपडटे समोर आलीय. पोलिसांनी आता रोहिणी खोतकराला अटक केलीय. रोहिणी खोतकरच्या घरात २२ तोळे सोने सापडले. घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना सात जिवंत काडतुसेही सापडली आहेत. (Chhatrapati Sabhajinagar Santosh Ladda Robbery Case)
आठवडाभरापूर्वी तिच्याच सांगण्यावरून दरोड्यात चोरी झालेले ३० किलो चांदी एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या गाडीत सापडली होते. या प्रकारामुळे आता या संपूर्ण घटनेला वेगळेच वळण लागले आहे. दरम्यान १५ मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथे राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडला होता. या दरोड्यातील संशयित आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या दरोड्यात साडेपाच किलो सोनं ३२ किलो चांदी आणि ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला पोलिसांनी अटक केलीय.पोलिसांना रोहिणीकडेच २२ तोळे सोनं सापडलं आहे. घराची झडती घेतल्यानंतर सोन्यासोबत सात जिवंत काडतुसं सापडले आहेत. पोलिसांनी सुपारी घेऊन भावाचा एन्काऊंटर केल्याचा आरोप रोहिणीने केला होता. आता तिलाच पोलिसांनी अटक केलीय.
दरम्यान भावाच्या जिवाला धोका होता. त्याला मारण्यासाठी सुपारी देण्यात आलीय. एका श्रीमंत व्यक्तीने अमोल खोतकरला मारण्याची सुपारी दिली, असा आरोप रोहिणीनं केला होता. पण आता रोहिणीलाच अटक करण्यात आल्याने प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. संतोष लड्डा यांच्या घरी करोडो रुपये पोत्यात भरून ठेवेलेले आहेत, अशी टीप त्यांचाच जवळचा मित्र बाळासाहेब इंगोले याने दिली होती. पण, बाळासाहेब इंगोले आणि त्याच्या काही साथीदार हे पैसे जादूटोणा करून पळवणार होते.
त्यासाठी त्यांनी एक महाराज शोधून ठेवला होता. पण याबाबतची माहिती हासबे नावाच्या आरोपीला मिळाली. हासबे याने त्याच्या टीमसह संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकत मुद्देमाल पळवून नेला, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. यात दरोड्यात अमोल खोतकराचा समावेश होता. पोलिसांनी त्याला अटक केली, पण तो गोळीबार करून पळून जात होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत ठार केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.