Samruddhi Highway News: 'समृद्धी' महामार्गावर दरोडा! चौघा प्रवाशांना लुटले; महिलेच्या अंगावरील दागिने, रोख रक्कम लंपास

Buldhana Breaking News: पहाटे चार प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील नगदी, वस्तू, दागिने असा ऐवज लुटण्यात आला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Samruddhi Highway Update
Samruddhi Highway UpdateSaam tv

संजय जाधव, बुलढाणा|ता. १० मे २०२४

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत आलेल्या समृद्धी महामार्गावर दरोड्याची घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज पहाटे चार प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील नगदी, वस्तू, दागिने असा ऐवज लुटण्यात आला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर आज पहाटे चौघा प्रवाशांना लुटल्याची घटना घडली. व्यावसायिक हृषीकेश शिवाजी दुरगुळे ( रा. तेरखेडा ता. वाशी, जिल्हा धाराशिव) हे आपल्या नातेवाईकांसह समृद्धीवरून ( एम एच १२ १९१९) ने प्रवास करीत होते. त्यांच्या समवेत हृषीकेशचे दाजी, बहीण, व अन्य एक जण होता.

प्रवासादरम्यान, चालकाला झोप येत असल्याने त्याने आराम करण्यासाठी त्यांनी वाहन एचपी पेट्रोल पंपच्या सर्व्हिसिंग केंद्राजवळ लावले. गाडीत आराम करत असतानाच पहाटे तीन वाजता तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील रोख रक्कम, ३ लॅपटॉप असा १ लाख ६५ हजारचा ऐवज हिसकावून घेतला .

Samruddhi Highway Update
Buldhana News: भेंडवळची घटमांडणी थोतांड, राजकीय भाकित केल्यास तक्रार करणार; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इशारा

यावेळी दरोडेखोरांनी महिलेचे मंगळसुत्र, अंगठीदेखील हिसकावून घेतली. त्यानंतर पळ काढला. या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आधी अपघात अन् आता दरोड्याचा प्रकार समोर आल्याने समृद्धीवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

Samruddhi Highway Update
Sharad Pawar: 'एनडीएमध्ये या', जाहीर सभेतून PM मोदींची ऑफर; शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com