अक्षय बडवे, पुणे|ता. ९ मे २०२४
नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेतून पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये यावं, अशी थेट ऑफर दिली होती. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पलटवार केला असून आमची विचारधारा, नेहरु, गांधींची आहे, असे म्हणत भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
काय म्हणाले शरद पवार?
"गांधी, नेहरुंची विचारधारा आमची आहे. हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर सर्व घटकांना सोबत घेऊन हा देश पुढे न्यावा लागेल. एका समाजाबद्दल वेगळे विचार मांंडले तर देशात ऐक्य राहणार नाही. पंतप्रधान मोदींची भाषणे ऐकली तर ती समाजा- समाजामध्ये गैरसमज पसरवयला पोषक आहेत. हे देशासाठी घातक आहे. आणि देशासाठी घातक असेल तिथे मी किंवा सहकारी राहणार नाही," असे शरद पवार म्हणाले.
"आमचे आरक्षण वाढवायला हरकत नाही. मात्र एखाद्या समाजाबाबत राज्यकर्ते अशी कशी भूमिका घेऊ शकतात. पंतप्रधान हे सगळ्यांचे असतात. ते संपूर्ण देशाचे नेतृत्व करत असतात. अशावेळी त्यांनी एका धर्माचे, भाषेचे विचार करायला सुरूवात केली तर या देशातील ऐक्य संपुष्टात येईल. मगं ते प्रधानमंत्री असो किंवा मंत्रीमंडळातील सदस्य असो," असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांना फटकारले..
यावेळी बोलताना अजित पवार यांनी अशोक पवार यांना दिलेल्या आव्हानावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "मतदाराचा अधिकार जर सरकारचा प्रतिनिधी घ्यायला लागला तर काय बोलणार? मंत्री म्हणून काम करणारी जी व्यक्ती असती त्या सर्वांवर काही पथ्य पाळण्याच्या अपेक्षा असतात. अशी वाक्य चौकशीत बसणारी आहेत. लोकांनी त्यांना संधी द्यावी की नाही ठरवावं," असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.