Crime News: १९ वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, बुलढाण्यातील खळबळजनक घटना

Student End Life: बुलढाण्यामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय विद्यार्थिनीनं जीवन संपवल्याची घटना घडलीय.
Student End Life
Student End LifeSaam Tv

संजय जाधव

Student End Life In Buldhana

अलीकडे गुन्हेगारीसोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाणही वाढलं आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये भर पडत आहे. कधी एकतर्फी प्रेमातून, कधी नैराश्यातून तर कधी अपयशी झाल्याने विद्यार्थी (Student End Life) असं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं समोर आलं आहे. तरूणांचं आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे, अशीच एक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. (Latest Crime News)

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. 19 वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थिनीनं असं टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'अशी' आहे घटना

मोताळा तालुक्यातील कोऱ्हाला बाजार (Korhala Bajar) या गावात ही घटना घडली आहे्. कोऱ्हाला बाजार या गावात राहणाऱ्या या शालेय विद्यार्थिनीच्या घरी कोणीही नव्हतं. त्या दिवशी तिने घराच्या लाकडाला दोरी बांधून आत्महत्या (Student End Life In Buldhana) केली, असं तिच्या चुलत बहिणीला आढळून आलं. त्याची माहिती तिने वडिलांनी दिली. तेव्हा त्यांनी घरी येऊन पाहिले, तेव्हा त्यांना ही घटना दिसली.

या विद्यार्थिनीला त्यांनी तातडीने खाली उतरविले. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केलं. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. निकिता बाळू ढोले (वय 19 वर्ष) असं या मृत विद्यार्थिनीचं नाव (Buldana latest news) आहे. पोलिसांनी घटनास्थली धाव घेत पंचनामा केला आहे. आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Student End Life
Palhgar Crime News : भागीदाराला गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिक पिता-पुत्रावर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबईतील घटना

मुंबईतच्या वाकोल्यातून धक्कादायक समोर आली होती. वाकोल्यात ४२ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांनी आत्महत्या केली होती. पोलीस वसाहतीच्या टेरेसवर त्यांनी आत्महत्या (Crime News) केली होती.

या घटनेने एकच खळबळ उडाली होती. इमारतीचा वॉचमेन अचानक टेरेसवर गेला होता. तेव्हा त्याला बनसोडे यांचा मृतदेह आढळला (latest crime news) होता. त्यानंतर त्यानी तातडीने स्थानिक नागरिक आणि वाकोला पोलिसांनी ही माहिती दिली होती.

Student End Life
Boy end life due to mother Scolded : आई ओरडली म्हणून १६ वर्षीय मुलानं जीवन संपवलं, विरारमधील दु:खद घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com