Pune Breaking: '२५ लाखांची खंडणी द्या, अन्यथा राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू'; पुण्यात भाजप नेत्याला धमकीचा फोन

BJP Leader Threatening Call For Extortion: पुण्यामध्ये भाजप नेते गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आला आहे. त्यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याची माहिती मिळत आहे.
BJP Leader Ganesh Bidkar
BJP Leader Ganesh BidkarYandex

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

पुण्यातील भाजप नेत्याला खंडणीसाठी फोन आला आहे. भाजप नेते गणेश बिडकर (BJP Leader Ganesh Bidkar) यांना धमकीचा फोन आल्याची मिळतेय. फोनमधून त्यांना 'खंडणी द्या, अन्यथा राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू' अशी धमकी देण्यात आली आहे. भाजप नेते गणेश बिडकर यांच्याकडून अज्ञात व्यक्तीने २५ लाख रूपये मागितले आहेत. दिवसेंदिवस खंडणी मागण्याचे प्रकार वाढत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून हा फोन आल्याची माहिती मिळत आहे. या फोनमध्ये व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २५ लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. यानंतर भाजप नेते गणेश बिडकर यांनी पोलिसांत (BJP Leader Threatening Call For Extortion) तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याप्रकरणी तपास सुरू आहे. मागील वर्षी देखील त्यांना धमकी देण्यात आली होती.

पुण्यामध्ये भाजप नेते गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आला आहे. त्यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याची माहिती मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना हा धमकीचा फोन आल्यामुळे मोठी खळबळ उडाली (Pune News) आहे. याप्रकरणी बिडकर यांनी गुन्हा नोंद केली आहे. बिडकर यांच्याकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी झाल्यामुळे आता राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

BJP Leader Ganesh Bidkar
Kranti Redkar Got Threat: अभिनेत्री क्रांती रेडकरला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार नोंद

पुणे पोलीस या खंडणी प्रकरणी तपास करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून बिडकर यांच्याकडे खंडणीची (Extortion) मागणी करण्यात आली आहे. खंडणी न दिल्यास त्यांना राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या फोनद्वारे त्यांना मिळाली आहे. मागील वर्षी देखील अशाच प्रकारची धमकी त्यांना मिळाली होती. तेव्हा देखील २५ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती.

BJP Leader Ganesh Bidkar
MNS Leader Extortion Case: मनसेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षाला पोलिसांच्या बेड्या, खंडणी प्रकरणात केली अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com