Shockig News: मुलाच्या हव्यासापोटी गाठला क्रूरतेचा कळस; संतापलेल्या नवऱ्याने बायकोसह तीन मुलींना संपवलं

Man Killed wife And Daughters: बिहारमधील चंपारण जिल्ह्यात धक्कादायक हत्यांकांड घडल्याचं समोर आलं आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि तीन अल्पवयीन मुलींची गळा चिरून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
Bihar Crime News
Bihar Crime NewsYandex

Bihar Crime News

बिहारमधील चंपारण जिल्ह्यात एक ५० वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नी आणि तीन अल्पवयीन मुलींची हत्या करून फरार झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. बिहारमधील चंपारण जिल्ह्यात धक्कादायक हत्यांकांड घडल्याचं समोर आलं आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.  (Latest Crime News)

मुलाच्या हव्यासापोटी आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला. शनिवारी रात्री आरोपी इदू मियानी आणि त्याची पत्नी आफ्रिन खातून यांच्यामध्ये वाद झाला (Bihar Crime News) होता. आफ्रिनने मुलगा जन्माला घालण्यात अपयशी ठरल्यामुळे गुरूवारी त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं, अशी माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. याच रागातून त्याने पत्नी व मुलींची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रागाच्या भरात आरोपीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केला. त्याने पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून हत्या केली. आफ्रीन आणि तिच्या मुली अर्बुन खातून (वय 15), शबरुन खातून (वय 12) आणि शाहजादी खातून (वय 9) घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्या (Man Killed wife And Daughters) होत्या. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निशाण (Bihar Crime) होते, असं पोलिसांनी दिली आहे.

शेजाऱ्यांना त्यांच्या घराच्या फरशीवर रक्त सांडलेले दिसले. तेव्हा ही घटना उघडकीस आली होती. सध्या आरोपी फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत, असं उपविभागीय पोलीस अधिकारी रंजन कुमार यांनी सांगितलं आहे. आरोपीवर यापूर्वी देखील त्याच्या एका १६ वर्षांच्या मुलीला उत्तर प्रदेशमधील सीतापूरजवळ चालत्या ट्रेनमधून ढकलून मारल्याचा आरोप (Crime News) होता. ही घटना २०१७ मध्ये घडली होती.

Bihar Crime News
Dhule Crime News : मध्य प्रदेशातून मुंबईत येत होती कार, धुळे पोलिसांना फक्त संशय आला, धक्कादायक बाब आली समोर

इदुवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. 2022 मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं (Man Killed wife And Daughters) होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने दुसऱ्यांदा लग्न केलं आह. त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं आहे. त्याच्या पहिल्या पत्नीला दोन मुले होते. आफ्रीन ही त्याची दुसरी पत्नी आहे. तिला पाच मुली होत्या. मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. अजून पोलीस आरोपीचा ठावठिकाणा तपासू शकले नाहीत.

Bihar Crime News
Pune Crime News : कोयत्याने वार, २ तरुण रक्तबंबाळ! तरुणीसाठी पुण्यात भरदिवसा थरारक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com