Crime : रेल्वे स्टेशनवर खुनी खेळ, बाप-लेकीला धाडधाड गोळ्या झाडल्या, मग स्वत:लाही संपवलं

Triple Murder at Bihar Railway Station: बाप-लेकीला संपवले, त्यानंतर सनकी तरूणाने स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये झाली. बीडमधील रेल्वे स्टेशनवर मंगळवारी रात्र थरार घडला
Crime
CrimeSaam tv
Published On

Bihar Crime News In Marathi : रेल्वे स्टेशनवर तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. बिहारमधील आरा रेल्वे स्टेशनवर एका २३ वर्षीय सनकी तरूणीने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बापाची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून आयुष्य संपवले. या प्रकारानंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे. आरा रेल्वे स्टेशनवर मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक आरा येथील गोढनामधील रहिवासी आहेत. २३ वर्षीय अमन कुमार सिंह याने मंगळवारी ५५ वर्षीय अनिल कुमार आणि १६ वर्षीय जिया कुमार यांच्यावर रेल्वे स्टेशनवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अमन याने स्वत:ही गोळी झाडून आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू केलाय. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्टल, जिवंत काडतूस जप्त केले आहेत.

Crime
Nashik : नाशिक हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, घरात घुसून ५ जणांनी केले कुकर्म

पोलिसांकडून वेगात तपास -

तरूणाने बाप-लेकीला संपवत स्वत: गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर आरा येथे खळबळ उडाली आहे. एएसपी परियच कुमार यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यांनी सांगितले की, प्रत्येक बाजूने या घटनेचा तपास केला जात आहे. प्रेमामुळे हे हत्याकांड झालं असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मुलगी दिल्लीमध्ये शिकायला होती, तर तिचे वडील एलआयसी एजंट होते.

पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील उपस्थित असणाऱ्यांची चौकशी केली. उपस्थितांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर घडली.

Crime
Crime : हात कापला अन् ड्रममध्ये भरण्याची धमकी, रक्ताच्या थारोळ्यात घाबरलेला नवरा पोलिसांत पोहचला

बाप-लेकीचा जीव घेतला, त्यानंतर स्वत:ही आयुष्य संपवले -

मिळालेल्या माहितीनुसार, जिआ दिल्लीला जाण्यासाठी आरा रेल्वे स्टेशनवर आली होती. क्रांती एक्सप्रेसने जाणार होती. मुलीला ट्रेनमध्ये सोडण्यासाठी वडील सोबत आले होते. त्यावेळी प्लॅटफॉर्मवरच सनकी अमन याने बाप आणि मुलीवर गोळ्या झाडल्या. दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्याने स्वत: गोळी मारून आत्महत्या केली.

मंगळवारी रात्री हा थरार आरा येथे घडला. गोळ्याचा आवाज ऐकल्यानंतर आरा रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली. उपस्थित असणारे प्रवासी सैरावैरा पळू लागले. लोकांना गँगवॉर झाल्याचा भास झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com