
आई-बाप आणि दोन मुलांचे मृतदेह पाहिले अन् नोकराच्या पायाखालची वाळूच सरकली. बंगळुरूमध्ये एका फ्लॅटमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. हत्या की आत्महत्या, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. आजूबाजूला चौकशी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबीय मुळचे उत्तर प्रदेशमधील आहे.
आयटीचे हब असलेलं बंगळुरु आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. फ्लॅटमध्ये चार जणांचे मृतदेह मिळालेत. सदाशिवनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. भाड्याच्या घरात राहणारे अख्ख कुटुंब मृत अवस्थेत आढळले. यामध्ये नवरा-बायको, ५ वर्षे आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचाही समावेश आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जातोय. पोलिसांना हत्या की आत्महत्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मृतदेहाजवळ कोणताही चिठ्ठी अथवा नोट न मिळाल्यामुळे पोलिसांच्या मनात वेगळाच संशय बळावला जातोय.
बंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आलाय. बंगळुरू शहर डीसीपी शेखर एच टेकनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज येथील राहणारे कुटुंब बंगळुरूमध्ये कामासाठी आले होते. त्यांच्याबाबत इतर माहिती तपासली जात आहे.
पोलिसांकडून मृत कुटुंबाची ओळखही उघड करण्यात आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय अनुप कुमार बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांची 35 वर्षीय पत्नी राखी, 5 वर्षांची मुलगी आणि 2 वर्षाचा मुलगा, सर्वजण रेंटच्या घरात राहत होते. अनुप कुमार एका सल्लागार कंपनीत काम करायचे. मृत्यू की हत्या हे प्रथमदर्शनी पोलिसांना समजलेले नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून तपास केला जात आहे
खोलीत पती-पत्नीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र मुलांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आधी मुलांना विष प्राशन करून नंतर पती-पत्नीने गळफास लावून घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. मृत कुटुंब उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत होते. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.