
बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील महिला वकिलाला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. गावच्या सरपंचाने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी या तरुणीला जेसीबीच्या पाईपाने अंग काळं-निळं पडेपर्यंत बेदम मारले होते. यामुळे महिलेच्या अंगातील रक्त साकळले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात एक नवा आणि मोठा ट्विस्ट आला आहे. ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला कोणीही मारहाण केलेली नाही. उलट तीच गावातील लोकांना त्रास द्यायची. ज्ञानेश्वरीला तिच्या घरच्यांनीच मारहाण केली असल्याचा मोठा दावा तिच्याच गावकऱ्यांनी केला आहे.
ज्ञानेश्वरी अंजान हिने सनगाव येथील सरपंचासह १० जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्ञानेश्वरी अंजान हिने गावकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती देखील गावकऱ्यांनी दिली आहे. वकिलीच्या जोरावर कायदा कसा चालवायचा हे तिला माहिती आहे. त्याच्यामुळे तिने आमच्यावर अगणित खोटे गुन्हे दाखल केले आहेत. माझ्यावर सुद्धा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. माझ्या मुलावर ३०७चा गुन्हा दाखल केला होता. आता दाखल केलेल्या गुन्ह्यात देखील गावकऱ्यांनी मारलेलं नाही, त्यांच्या कुटुंबाचे आपापसात भांडण झालं आहे, असा दावा गावात राहणाऱ्या पांडुरंग सोपानराव अंजान यांनी केला.
ज्ञानेश्वरी अंजान या रात्री येऊन इतरांच्या घराचे दार वाजवतात. मंदिरात कार्यक्रम सुरू असल्यास तो बंद करायला लावतात तसे न केल्यास धमक्या पण देतात. त्यांना झालेली मारहाण ही खोटी असून तिच्या घरच्यांनीच केलेली आहे. सगळं प्लॅन करुन केलं आहे, खोटं आहे, असं कल्पना अंकुश अंजान या महिलेनं सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.