Bangladesh Crime : फेसबुक पोस्ट अन् तलावात आढळला मृतदेह; न्यूज चॅनलच्या एडिटरचा संशयास्पद मृत्यू

Journalist Dead Body Found In Dhaka Lake : बांगलादेशमध्ये एका महिला पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झालाय. एका तलावात या महिलेचा मृतदेह आढळला होता.
 महिला पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू
Journalist Dead Body Found In Dhaka LakeSaam Tv
Published On

मुंबई : बांगलादेशातील एका तलावात काल २८ ऑगस्ट रोजी ३२ वर्षीय महिला पत्रकाराचा मृतदेह सापडला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, मृत पत्रकार महिलेचं नाव सारा रहनुमा असं आहे. ती बंगाली भाषेतील न्यूज चॅनलमध्ये न्यूजरूम एडिटर होती. रहनुमाचा मृतदेह बुधवारी पहाटे ढाक्यामधील एका तलावात सापडला.

महिला पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

याबाबत सविस्तर वृ्त्त असं की, बुधवारी रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला तिचा मृतदेह ढाक्याच्या हातीरझिल तलावात तरंगताना आढळून आला होता. त्यानंतर मृतदेह तलावातून बाहेर काढून ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आला (Bangladesh Crime News) होता. मात्र, पहाटे दोनच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं.

बांगलादेशमधील धक्कादायक घटना

बांगलादेशात नुकत्याच झालेल्या हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पत्रकार सारा रहनुमाचा झालेला मृत्यू सर्वांसाठीच मोठा धक्कादायक आहे. पण त्याहून धक्कादायक (Crime News) बाब म्हणजे तिच्या मृत्यूमागील गूढ अजून उलगडलेलं नाहीये.पोलिसांनी तपासापूर्वी मृत्यूचं कारण सांगण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मृत्यूपूर्वी साराने तिच्या फेसबुक आयडीवरून दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे तिच्या मृत्यूचं कारण आणखीनच गुंतागुंतीचं झालंय.

साराने तिच्या मृत्यूच्या आदल्या रात्री फेसबुकवर एक पोस्ट केली, यामध्ये तिने मित्र फहीम फैसलला टॅग करत काही फोटो शेअर केले होते.कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, तुझ्यासारखा मित्र भेटणं खूप चांगलं (Journalist Dead Body) होतं. देव तुम्हाला नेहमी आशीर्वाद देवो, तुमची सर्व स्वप्ने लवकर पूर्ण व्हावीत , अशी आशा आहे. मला माहित आहे की, आपण एकत्र खूप नियोजन केलंय. माफ करा आपण योजना पूर्ण करू शकणार नाही. यासोबतच तिनं '..असं जगण्यापेक्षा मृत्यू बरा' असं देखील लिहिलं होतं.

 महिला पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू
Ulhasnagar Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, भेटायचा प्लान अन्... उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता गर्भवती

साराच्या मृत्यूमागे राजकीय द्वेष असण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुलगा साजिब वाजेद यांनी साराच्या मृत्यूवरून युनूस सरकारवर निशाणा (Journalist Death) साधलाय. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आणखी एक क्रूर हल्ला, असं म्हणत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केलीय.

 महिला पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू
Sangli Crime : चोर समजून पोतराजासह दोघांना मारहाण; विटा-कराड रस्त्यावरील प्रकार, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com