Baba Siddiqui Death: बाबा सिद्धकी हत्या प्रकरणातील चौथा आरोपी कोण? तिन्ही शूटर्सला देत होता सूचना

Baba Siddiqui Death: बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटलीय. मोहम्मद झिशान अख्तर असं त्याचं नाव आहे. तो पंजाबचा रहिवासी असून तिन्ही शुटर्सला सूचना देत ​​होता.
Baba Siddiqui Death
Baba Siddiqui Death
Published On

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटलीय. तो पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील आहे. जालंधर जिल्ह्यातील नकोदरच्या शंकर गावात राहणारा झिशान अख्तरने इतर आरोपींना राहण्याची व्यवस्था करून दिली होती. याशिवाय तो तिन्ही शुटर्सला सूचना देत ​​होता. सध्या तो फरार असून मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बाबा सिद्धिकी हत्येप्रकरणी पोलिसांनी गुरमेल बलजीत सिंग, रहिवासी, कैथल, हरियाणा आणि धर्मराज राजेश कश्यप, उत्तर प्रदेश, अशी दोन हल्लेखोरांना अटक केलीय. आज दोन्ही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने एकाला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर एका आरोपीच्या वयाबाबत तपासणी करण्याच्या सुचना कोर्टाने दिल्या आहेत. कारण हा आरोपी स्वत:ला अल्पवयीन असल्याचं सांगत आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर झिशान गुरमेलसोबत मुंबईला आला

२०२२ मध्ये जालंधर ग्रामीण पोलिसांनी झिशान अख्तरविरोधात खून आणि दरोड्याचा गुन्हा दाखल होता. तो पटियाला तुरुंगात पाठवले होते. जूनमध्ये तो तुरुंगातून बाहेर आला. पटियाला तुरुंगात असताना तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात आला आणि त्यांच्या टोळीत सामील झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर झिशान अख्तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी गुरमेलच्या घरी गेला होता. दोघेही एकत्र मुंबईला आले त्यानंतर सर्व आरोपी मुंबईत एकत्र राहत होते. झिशान अख्तर तिन्ही शुटर्सला सूचना देत होता. झिशान अख्तरनेच बाबा सिद्धिकी यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना भाड्याने खोली घेऊन दिली आणि इतर रसद पुरवण्याची व्यवस्था केली होती.

अवघ्या २१ वर्षांचा आहे झिशान अख्तर

झिशान अख्तर फक्त २१ वर्षांचा आहे. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील सरकारी शाळेतून घेतले आहे. आरोपीचे वडील मोहम्मद जमील हे टाइल्सचे कंत्राटदार म्हणून काम करतात. झिशान अख्तरला अटक करण्यासाठी मुंबई पोलीस छापे टाकत आहेत. मुंबई पोलिसही पंजाब पोलिसांच्या संपर्कात असून त्याच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणांबाबत त्यांची मदत घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com