
पोटच्या पोरीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला होणार फाशी
अत्याचारानंतर आरोपीने गळा आवळून मुलीची केली होती हत्या
पोक्सो न्यायालयाने आरोपीला दिली मृत्युदंडाची शिक्षा
आसनसोल : विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सुपर्णा बंदोपाध्याय यांनी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या तिच्या वडिलांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणात सर्वोच्च शिक्षा म्हणून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडित १४ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केला होता. अत्याचारानंतर आरोपीने मुलीची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या आईने केलेल्या लेखी तक्रारीवरुन १२ मे २०२४ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याच्या कलम ६ (बलात्कार), भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) आणि कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आणि युक्तिवादाच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले.
६ ऑगस्ट रोजी युक्तिवाद संपल्यानंतर आरोपीला पोक्सो कायदा कलम ६ आणि आयपीसी कलम ३०२ अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय कलम २०१ अंतर्गत आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर दंड भरला नाही, तर एका वर्षाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. पीडितेच्या आईला पीडित भरपाई निधीतून ५ लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश न्यायाधीशांनी राज्य सरकारला दिले.
या प्रकरणामध्ये मृत मुलीची आई, तिचे नातेवाईक, रुग्णालयातील डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ञांसह एकूण १६ साक्षीदारांनी साक्ष दिली. आरोपीने सुनावणीदरम्यान गुन्हा कबुल केला. १२ मे २०२४ च्या रात्री १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिचे आईवडील आणि भावंडांसह घरात झोपली होती. दुसऱ्या दिवशी पीडितेच्या आईने पाहिले की मुलीचा चेहरा चादरने झाकलेला होता. चादर काढल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचे आईला समजले. तिच्या मानेवर डाग होते; नाक, कानातून रक्त येत होते. मुलीच्या आईने तिच्या नवऱ्याला सांगितले, त्याने मृत्यू झाल्याचे लपवण्याचा सल्ला दिला. नवऱ्याकडे दुर्लक्ष करत मुलीची आई मोठ्याने ओरडू लागली.
अल्पवयीन मुलीला आसनसोल जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. दोरीने मुलीचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. त्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले. दोन दिवसांनी मुलीच्या आईने तिच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. मुलीच्या शरीरावर सापडलेले पुरावे हे तिच्या वडिलांच्या डीएनएशी जुळले. हत्येत वापरण्यात आलेली दोरी आरोपीने सांगितलेल्या ठिकाणाहून जप्त करण्यात आली. १ वर्ष ३ महिने या कालावधीत न्यायालयाने दिलेला हा निर्णय हा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.