Amravati Crime : धक्कादायक! अंगणात गप्पा मारत बसलेल्या कुटुंबाला कारने चिरडलं; ३ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

Amravati Crime : रात्री आठच्या सुमारास आपल्या अंगणात गप्पागोष्टी करत बसलेल्या कुटुंबाला कार चिरडल्याची घटना घडलीय. या प्रकारात ३ जण जागीच ठार झाले असून अन्य ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Amravati Crime
Amravati Crimesaam Tv
Published On

(अमर घटारे )

Amravati Crime man rammed car over family:

पूर्व वैमनस्यातून एका व्यक्तीने गप्पा करत अंगात बसलेल्या कुटुंबातील सहा लोकांना चिरडल्याची घटना घडलीय. या प्रकरणात ३ जणांचा मृत्यू झालाय तर ३ जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दर्यापूर तालुक्यातील नाचोना या गावात ही घटना घडलीय. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नाचोना गावात ही घटना घडलीय. (Latest News)

या प्रकारातील आरोपीचा दारूचा व्यवसाय नाचोना या गावांमध्ये अवैधपणे सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाचोना गावातील अंभोरे कुटुंबीय आपल्या घराच्या अंगात गप्पा करत बसले होते. त्यावेळी संशंयित आरोपीने गप्पा करत बसलेल्या अंभोरे कुटुंबियांना चिरडलं. पूर्व वैमनस्यातून त्याने हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झालाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनुसया शामराव अंभोरे (वय६७), शामराव लालूजी अंभोरे (वय ७० मृत्यू), अनारकली मोहन गुजर (वय ४३), असं मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर शारदा उमेश अंभोरे (वय ४०) उमेश अंभोरे (वय ४० ), किशोर शामराव अंभोरे (वय ३८) सर्व नाचोना खुर्माबाद येथील राहणारे आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेतील बचावलेल्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सर्वजण रस्त्यावर उभे होते. त्यावेळी संशयित आरोपीने कार त्यांच्या अंगावर घातली. जाणूनबुजून त्याने कार आमच्या अंगावर आणत होता. आम्हाला पळून जाण्याचे त्याने संधी दिली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com