Ambernath Crime: पाहूणे म्हणून आले आणि दागिने चोरून पसार झाले; अखेर बंटी-बबली असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Ambernath Crime Newsin Marathi : अंबरनाथ पश्चिम भागात या बंटी आणि बबलीने चोरी केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी बंटी बबलीला अटक करत त्यांच्याजवळील मुद्देमालही हस्तगत केला आहे.
File Photos
File PhotosSaam Tv
Published On

Ambernath Crime News:

अंबरनाथमध्ये मित्राच्या लहान मुलाला बघण्याच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या बंटी बबलीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दागिने चोरणाऱ्या बंटी बबलीला अंबरनाथ पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. अंबरनाथ पश्चिम भागात या बंटी आणि बबलीने चोरी केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी बंटी बबलीला अटक करत त्यांच्याजवळील मुद्देमालही हस्तगत केला आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडल?

अंबरनाथ पश्चिम येथील न्यू वडवली परिसरातील थारवाणी आर्यांनी नावाची इमारत आहे. मोनिका रोहित निकम हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. नऊ डिसेंबरला रोहित निकम यांचे मित्र सारीस कांबळे आणि दिपाली मांजूरे हे रोहितच्या लहान मुलाला बघण्यासाठी पाहुणे म्हणून आले होते. मात्र घरातील अंदाज घेत त्यांनी कपाटात ठेवलेले तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नाशिकला पळून गेले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

File Photos
Thane Crime News: ठाण्यात तिहेरी हत्याकांड, रागाच्या भरात बायको-मुलांना संपवलं, CCTV व्हिडीओ आला समोर

त्यानंतर रोहितची पत्नी मोनिका यांना कपाटात ठेवलेली दागिन्याची पर्स सापडली नाही. आपल्या घरी रोहितच्या मित्राशिवाय कोणी आलं नाही. त्यामुळे त्यांनी संशय घेत अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात सारीस कांबळे आणि दिपाली मांजूरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यातील अधिकारी संदिप भालेराव यांच्या पथक नाशिकमध्ये दाखल झालं.

File Photos
MP Crime News: धक्कादायक! भावाच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी वहिनीला जिवंत जाळलं

संदिप भालेराव यांच्या पथकाने या बंटी बबलीला अटक केली. आरोपीची अंबरनाथ पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून ३६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. बंटी बबलीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अंबरनाथ पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक शिंदे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com