Akola Crime : घरातून ५ लाख चोरले, घरमालकाला कळताच आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू

Akola News: घरात चोरी झाल्याचं कळताच घर घरमालकाला हृदयविकाराचा झटका जागेवरच दुर्दैवी मृत्यू. तब्बल 5 लाखांचा मुद्देमाल गेला चोरीला. अकोल्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील घटना.
Crime
घरातून ५ लाख चोरले, घरमालकाला कळताच आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यूSaam tv
Published On

अकोला जिल्हातील मूर्तिजापूर तालुक्यातील घरात चोरीची घटना घडली. घरात चोरी झाल्याची माहिती मिळताच, घरमालक अशोक बोळे यांना जोरदार धक्का बसला. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

काल रात्री सुमारे पावणे आठ वाजता अशोक बोळे यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. घरातून सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम असा मिळून अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. चोरी झाल्याची माहिती मिळताच अशोक बोळे यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. मात्र वाटेतच त्यांना चक्कर आल्याने ते खाली जमिनीवर कोसळले. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं.

Crime
Akola News: क्रुरतेचा कळस! थेट मुक्या प्राण्यांना खाण्यातून दिलं विषारी औषध, 25 पेक्षा अधिक कुत्र्यांचा दुर्देवी मृत्यू

या संदर्भात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांसमोर चोरट्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. स्थानिक सीसीटीव्ही फुटेज, माहिती तंत्रज्ञान व गुप्त माहितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे घरफोडी तर दुसरीरडे त्या धक्क्यामुळे झालेला मृत्यू. अशा घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर चोरांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Purva Planade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com