सचिन बनसोडे साम टीव्ही, अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका पुन्हा हादरला आहे. कारण नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे पाटात एका तरूणाच्या शरीराचे तुकडे सापडले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तरूणाच्या शरिराचे तुकडे करून पाटातील पाण्यात फेकून दिल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ही निर्घृण हत्या कोणी आणि का केली? याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.
एका अनोळखी (Ahmednagar Crime News) व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करून गोणीमध्ये भरून पाटाच्या पाण्यात फेकून दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे घडली आहे. गावालगत असणाऱ्या पाटामध्ये अंदाजे २५ ते ३० वर्ष वय असलेल्या एका अनोळखी पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत. त्यामुळे देडगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
देडगाव परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याबाबत नेवासा (Nevasa) पोलीस ठाण्यात देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद ससाने यांनी तक्रार दिली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने (Crime News) नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कुकाणा दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस नाईक किरण पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केलाय.
ही घटना वीस दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाच्या मिळालेल्या तुकड्यांची तपासणी नेवासा फाटा येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आली आहे. या मृतदेहाचे पाय, मुंडके, मांडी असे शरीराचे अवयव (Youth Dead Body Parts) सापडले आहेत.
मृतदेहाची ओळख पटवणं तसेच खून करून मानवी शरीराची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान नेवासा पोलिसांसमोर आहे. घटनास्थळी शेवगवाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, श्रीरामपुरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी भेट दिली आहे. तर याप्रकरणी पोलिसांना खुनाच्या अनुषंगाने काही दुवे मिळाले आहेत. त्याआधारे मारेकऱ्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.