अभिजीत देशमुख, कल्याण
फसवणूक करत लग्न केलं, त्यानंतर शरीर सुखापासून वंचित ठेवलं, अशी तक्रार करत ३२ वर्षीय विवाहितीने पोलिसांत धाव घेतली आहे. ३२ वर्षीय विवाहित महिलेने ४० वर्षीय पतीविरोधात खडकपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कल्याणमधून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. या महिलेचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ३२ वर्षीय महिला कल्याण जवळ असलेल्या शहाड परिसरात पतीसोबत राहत होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महिलेच्या तक्रारीनुसार तिचा पती तिला शारीरिक सुखापासून वंचित ठेवत होता. तसेच त्याने फसवणूक करत आपल्याशी लग्न केले. यामुळे शारीरिक सुखापासून वंचित ठेवल्याची तक्रार महिलेने पोलिसांत नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी महिलेच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणमध्ये ३२ वर्षीय तरुणीने कल्याणमधील ४० वर्षाच्या तरुणासोबत लग्न केलं. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी विवाहाला विलंब झाल्याचे या तरुणाने विवाहापूर्वी बायकोला सांगितले. नवरा शिकलेला असल्याने तक्रारदार महिलेने त्याला पसंत केले. दोघांचं इगतपुरीत थाटामाटात लग्न पार पडलं.
लग्नानंतर नवरा विक्षिप्तपणे वागत असल्याचे तक्रारदार महिलेला आढळले. तिने नवऱ्याला भावनिक साद घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र नंतर तक्रारदार महिलेला नवऱ्यामध्ये काही दोष आढळले. त्यानंतर ती माहेरी गेली.
पुढे नवरा आणि सासरच्या आग्रहामुळे पुन्हा सासरी आली. त्यावेळी नवरा लपून औषध घेत असल्याचे आढळले. त्यामुळे महिलेने गुपचूप संबंधित डॉक्टरकडे जाऊन विचारणा केली. त्यावेळी डॉक्टरने नवऱ्यात भावनिक दोष असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेतली.
भावनिक दोष असल्याने नवरा शरीर सुखापासून वंचित ठेवत असून विश्वासघात आणि फसवणूक करत असल्याची तक्रार महिलेने नवऱ्याविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.