Zelio Gracy Plus: सिंगल चार्जवर गाठेल १३० किमीचा पल्ला; मायलेज सुपर अन् किंमतही आकर्षक, जाणून घ्या फीचर्स
झेलिओने बजेट सेगमेंटमध्ये ग्रेसी प्लस ईलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.
एका चार्जमध्ये १३० किमी मायलेज देणारी ही स्कूटर आकर्षक डिझाईनसह आली आहे.
किंमत ₹८०,००० च्या आसपास असून फीचर्स स्मार्ट आहेत.
विद्यार्थ्यांसाठी आणि डेली कम्युटसाठी ही उत्तम पर्याय ठरू शकते.
ईलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असल्यानं आता ऑटो कंपन्यांनी ईलेक्ट्रिक बाईक बनवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केलीय. काही कंपन्या ग्राहकांसाठी हाय-स्पीड ईलेक्ट्रिक स्कूटर बनवत आहेत. तर काही कंपन्या कमी-स्पीड असलेल्या स्कूटर लाँन्च करत आहेत. आता Zelio E Mobility नं सर्व सामान्य ग्राहकांना लक्षात घेत कमी बजेटची झेलिओ ग्रेसी प्लस नावाची एक नवीन स्कूटर लाँन्च केलीय. या स्कूटरचं नाव Zelio Gracy Plus आहे.
शानदार आहेत फीचर्स ( Zelio Gracy Plus electric scooter with 130 km range and low price)
या स्कूटरला दोन बॅटरी पर्याय देण्यात आली आहेत. तर १८५ मिमी ग्राउंड क्लिअरन्स असून या स्कूटरची १५० किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. उच्च ग्राउंड क्लिअरन्स आणि आरामदायक रायडिंगमुळे ही स्कूटर अनेकांच्या पसंतीस उतरेल. ही ईलेक्ट्रिक स्कूटर व्यावसायिक व्यक्ती, विद्यार्थी आणि डिलिव्हरीचे कामे करणाऱ्यांसाठी शानदार ठरणार आहे. या ग्राहकांना केंद्रीत करत स्कूटरची डिझाइन करण्यात आले आहे.
ताशी २५ किमी वेगाने धावणाऱ्या या कमी गतीच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ६०/७२ व्ही बीएलडीसी मोटर आहे. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे १.८ युनिट वीज घेते, असा कंपनीने दावा केलाय. लिथियम आयन बॅटरी व्हेरिएंटची स्कूटर ४ तासात चार्ज होते. तर जेल बेस्ड व्हेरिएंटची स्कूटर ८ ते १२ तासात चार्ज होते. मात्र एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही १३० किमी पर्यंतचा प्रवास सहजगत्या पूर्ण करू शकतात.
लिथियम-आयन बॅटरी व्हेरिएंट स्कूटरची (60V/30AH) किंमत 65,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या प्रकारातील स्कूटर एका चार्जवर 110 किमी पर्यंतची रेंज देते. 74V/32AH व्हेरिएंटची स्कूटर तुम्हाला 69,500 रुपयांत मिळेल. या प्रकारातील स्कूटर एका चार्जवर 130 किमी पर्यंतची रेंज देईल.
जेल-आधारित बॅटरी असलेल्या प्रकाराच्या स्कूटरची किंमत ५४,००० रुपये (एक्स-शोरूम) आणि ६१,००० रुपये (एक्स-शोरूम) आहे. ते अनुक्रमे ८० किमी आणि १३० किमीची रेंज देतात. दरम्यान कंपनी स्कूटरवर दोन वर्षांची वॉरंटी, लिथियम आयन बॅटरीवर तीन वर्षांची आणि जेल आधारित व्हेरिएंटवर एक वर्षाची वॉरंटी देत आहे. सध्या, कंपनीकडे देशभरात ४०० हून अधिक डीलरशिप (शोरूम) आहेत, ज्या २०२५ च्या अखेरीस १००० आउटलेटपर्यंत नेणार असा कंपनीचा प्लॅन आहे.
झेलिओ ग्रेसी प्लस स्कूटरचं वैशिष्ट्य काय आहे?
झेलिओ ग्रेसी प्लस एकदा चार्ज केल्यावर १३० किमीपर्यंतची रेंज देते.
ही स्कूटर कोणासाठी योग्य आहे?
विद्यार्थ्यांपासून ऑफिस जाणाऱ्या व्यक्तींना ही स्कूटर अत्यंत उपयुक्त ठरते, कारण ती कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज देते.
या स्कूटरमध्ये कोणते स्मार्ट फीचर्स आहेत?
या स्कूटरमध्ये डिजिटल डिस्प्ले, यूएसबी चार्जिंग, अँटी-थेफ्ट अलार्म, आणि रिव्हर्स मोडसारखी स्मार्ट फीचर्स आहेत.
स्कूटरची किंमत किती आहे?
झेलिओ ग्रेसी प्लस स्कूटरची किंमत सुमारे ₹८०,००० पासून सुरू होते, ज्यामुळे ती बजेटमध्ये येते.
ही स्कूटर कुठे उपलब्ध आहे?
झेलिओ ग्रेसी प्लस स्कूटर भारतातील प्रमुख झेलिओ डीलरशिप आणि वेबसाइटवर उपलब्ध आहे.
चार्जिंगसाठी किती वेळ लागतो?
पूर्ण चार्जिंगसाठी सुमारे ४ ते ५ तास लागतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.