Google Chrome: गुगल क्रोम वापरताय तर ही बातमी तुमच्यासाठी! सरकारने दिला अलर्ट, वाचा

भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी इशारा दिला आहे. विशेषतः विंडोज युजर्सना सावध राहण्याचा आणि ब्राउझर त्वरित अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अन्यथा सुरक्षा धोक्यात येऊ शकते.
Google Chrome
Google Chromeyandex
Published On

भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची चेतावणी जारी केली आहे. विशेषतः विंडोज आणि गुगल क्रोम वापरणाऱ्या युजर्सना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यूजर्सना गुगल क्रोमचे नवीन अपडेट त्वरित डाउनलोड करून इन्स्टॉल करावे, ज्यामुळे हे सुरक्षा धोके दूर होतील. सुरक्षित इंटरनेट ब्राउझिंगसाठी ही पावले उचलणे अत्यावश्यक आहे.

गुगल क्रोम युजर्सनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगार यांना कारणीभूत ठरु शकतात. कारण काही चुका सायबर हल्ल्यांना कारणीभूत ठरू शकतात. या त्रुटी API च्या चुकीच्या फ्री skia आणि V8 मध्ये फ्रीच्या वापरामुळे निर्माण झाल्या आहेत. तसेच सायबर गुन्हेगार हे तुमच्या प्रणालीला धोका पोहचवू शकतात.

Google Chrome
WhatsApp Update: व्हॉट्सॲपचे धासू फीचर, आता एकाच फोनमध्ये उघडता येणार अनेक अकांऊट

CERT-In यांच्या माहितीनुसार, क्रोम ब्राउजरमध्ये उपलब्ध त्रुटी सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी आहे आणि याच कारणामुळे यूजर्सना यांच्यामुळे गंभीर नुकसान होवू शकते. एजेंसीने सांगितले की या त्रुटींचा वापर करुन सायबर हल्लेखोर यूजर्सना दुरुनच लक्ष्य करु शकतात. यासाठी त्यांना डिव्हाईसवर प्रवेशाची गरज लागत नाही. सायबर हल्लेखोर खास डिझाइन केलेल्या वेबपेजच्या मदतीने तुमचा डिव्हाइस हॅक करू शकतो. यानंतर वैयक्तिक डेटा हॅक करणे, ओळख चोरी करणे किंवा तुमच्या खात्याची फसवणूक करून आर्थिक नुकसान करणे अशा प्रकारच्या हानिकारक कारवाया केल्या जाऊ शकतात.

Google Chrome
Google Chrome: कुणीही पाहू शकणार नाही तुमची ब्राउजिंग हिस्ट्री, फक्त गुगल क्रोममध्ये करा 'ही' एक सेटिंग

गुगल क्रोम ब्राउझर आपोआप अपडेट होतो. जर तुम्ही क्रोम अद्याप अपडेट केला नसेल तर ते करणे गरजेचे आहे. जर तुमच्या ब्राउझरला नवीन अपडेट मिळाले नसेल तर सुरक्षा दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. Linux साठी 113.0.6943.53 पेक्षा जुने, तसेच Windows किंवा Mac साठी 113.0.6943.53/54 पेक्षा जुने Chrome वर्जन जोखमीच्या श्रेणीत येते. यूजर्सनी सुरक्षिततेसाठी ब्राउझरचे नवीन वर्जन इन्स्टॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com