ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण दिवसभरात अनेक वेळा गुगल क्रोमचा (Google Chrome)वापर करतो. पण क्रोमवर काहीह सर्च करताना क्रोमच्या ब्राउजर हिस्ट्रीमध्ये सगळी माहिती सेव्ह राहते.
गुगल क्रोमवर एक असाही मोड आहे ज्यामध्ये सर्च केल्यास कोणतीही हिस्ट्री क्रिएट म्हणजेच तयार होत नाही.
इनकॅाग्निटो मोडचा (Incognito Mode) सर्वाधिक वापर सीक्रेट सर्चसाठी केला जातो.
इनकॅाग्निटो मोडला प्रायव्हसी मोड देखील म्हणतात.
युजर्सच्या मते, इनकॅाग्निटो मोड सुरक्षित आणि प्रायव्हेट ब्राउजिंगसाठी चांगला पर्याय आहे.
या ब्राउजरवर जे काही सर्च केल जातं. तो सर्व डेटा सुरक्षित राहतो.
यामध्ये सर्च केलेले रेकॅार्ड कुठेच सेव्ह राहत नाही.
या मोडचे वैशिष्ट्य म्हणजे, विंडो बंद होताच सर्व काही आपोआप डिलीट होते.