ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१९ ते २०२५ पर्यंत आठ वेळा बजेट सादर केले. या वेळी त्यांनी नेसलेल्या साडीने सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यांच्या खास लूक मागे नेहमीच काही संदेश राहिला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१९ मध्ये बजेट सादर करताना गुलाबी रंगाची साडी नेसली होती. जे स्थिरता आणि गांभीर्यचे प्रतीक आहे. यावेळी भारताचा विकस दर ३. ८७ टक्के होता.
२०२० मध्ये त्यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. जी कोरोना सारख्या महामारीच्या काळात उर्जा आणि आशेचा संदेश देते.
२०२१ चे बजेट सादर करताना त्यांनी लाल रंगाची ऑफ व्हाइट बॅार्डर असलेली साडी परिधान केलेली. लाल रंग शुभ संकेत आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते.
२०२२ मध्ये निर्मला सीतारमण यांनी ओडिशाची मरुन- ब्रॅाउन रंगाची बोमकाई साडी नेसली होती. हा रंग सामर्थ्य आणि स्थिरता दर्शवते. २०२२ मध्ये भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लाल रंगाची साडी नेसली होती. जी दृढनिश्चय, शक्ती आणि धैर्याचे संदेश देते. फोर्ब्स २०२३ सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारमण ३२व्या स्थानावर होते.
२०२४ मध्ये त्यांनी निळ्या रंगाची टसर सिल्क साडी परिधान करुन शास्वता आणि २०४७ पर्य़ंतच्या विकसित भारतच्या ध्येयावर भर दिला. निळा रंग शांतता आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जाते.
२०२५ चे बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी मधुबनी कलेची गोल्डन वर्क असलेली ऑफ-व्हाइट साडी निवडली. त्यांनी ती शाल आणि लाल ब्लाउजसोबत पेअर केली. ही साडी पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी भेट केली होती.