Redmi 15 5G भारतात अधिकृतपणे लाँच, किंमत ₹14,999 पासून सुरू
6.9-इंच FHD+ 144Hz डिस्प्ले आणि Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर
7000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट
Android 15 आधारित HyperOS 2 सह AI-संचालित फीचर्स
Xiaomi ने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन सिरीजमध्ये आणखी एक आकर्षक मॉडेल सादर करत जागतिक स्तरावरील 15 वर्षांचा प्रवास आणि भारतातील 11 वर्षांचा टप्पा गाठला आहे. कंपनीने बजेट-फ्रेंडली सेगमेंटमध्ये Redmi 15 5G मोबाईल लाँच केला असून, यामध्ये फ्लॅगशिप लेव्हल फीचर्स, AI तंत्रज्ञान आणि दमदार परफॉर्मन्स देणारी बॅटरी यांचा समावेश आहे.
Redmi 15 5G मध्ये 6.9-इंचाचा FHD+ अॅडॉप्टिव्ह सिंक डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत असून TUV Rheinland ट्रिपल सर्टिफिकेशन मिळाले आहे. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो आणि सतत पाहणारे तसेच गेमर्ससाठी सिनेमा सारखा अनुभव मिळतो, असा Xiaomi चा दावा आहे.
हा स्मार्टफोन दमदार Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 8GB रॅम आणि जलद कार्यक्षमतेसाठी UFS 2.2 स्टोरेज दिले असून वापरकर्त्यांना उत्कृष्ट परफॉर्मन्सचा अनुभव मिळतो. कॅमेरा विभागात 50MP AI ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा असून AI Erase, AI Sky, AI ब्युटी यांसारखे स्मार्ट फीचर्स समाविष्ट आहेत. दीर्घकाळ वापरासाठी 7000mAh क्षमतेची EV-ग्रेड बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगसह येते. कंपनीचा दावा आहे की फोन 55 तास कॉल टाइम किंवा 13.5 तास स्टँडबाय वेळ देऊ शकतो.
सॉफ्टवेअरच्या बाबतीत Redmi 15 5G हा Android 15 वर आधारित Xiaomi HyperOS 2 वर चालतो. यात Circle to Search, AI Erase, AI Sky आणि Gemini Live यांसारखी नवीनतम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन तीन रंगांत उपलब्ध होईल Frosted White, Midnight Black आणि Sandy Purple.
स्मार्टफोनची किंमत किती?
किंमतीकडे पाहिले तर 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 8GB + 128GB मॉडेल 15,999 रुपये आणि 8GB + 256GB मॉडेल 16,999 रुपयांना उपलब्ध होईल. Redmi 15 5G ची अधिकृत विक्री 28 ऑगस्ट 2025 पासून Mi.com, Amazon.in, Mi Home आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर सुरू होणार आहे.
Redmi 15 5G ची किंमत किती आहे?
Redmi 15 5G ची सुरुवातीची किंमत भारतात ₹14,999 आहे (6GB + 128GB व्हेरिएंट).
Redmi 15 5G मध्ये कोणता प्रोसेसर आहे?
यात Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर दिला आहे, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उपयुक्त आहे.
या मोबाईलची बॅटरी क्षमता किती आहे?
Redmi 15 5G मध्ये 7000mAh ची EV-ग्रेड बॅटरी असून 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
Redmi 15 5G कधीपासून खरेदी करता येईल?
या मोबाईलची विक्री 28 ऑगस्ट 2025 पासून Mi.com, Amazon.in आणि Mi Home वर सुरू होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.