
सध्या लोक डिजिटल उपकरणांचा वापर करून पेमेंट घेत असतात. अगदी रिक्षावाल्यापासून ते लहानश्या वाण्याच्या दुकानापर्यंत लोक डिजिटली पेमेंट करतात. पण तुम्हाला माहितीये का? ऑनलाइन व्यवहार करताना तुम्हाला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणतीही गल्लत झाल्यास थेट तुमच्या अकाउंटमधल्या पैशांवर परिणाम होतो. त्यासाठी डिजिटल पेमेंट्स अवेअरनेस वीकमध्ये तुम्हाला डिजिटल पेमेंट्स करण्यासाठी व्हिसाच्या महत्त्वपूर्ण टिप्स सांगितल्या जाणार आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत.
1. सुरक्षित कॉन्टॅक्टलेस पेमेंट्ससाठी फोनवर कार्डस् सेव्ह करा
बँकिंग व पेमेंट अॅप्समध्ये तुम्हाला कार्ड क्रेडेन्शियन्स स्टोअर करता येऊ शकतात. त्याने तुम्ही तुमचा फोन टॅप करून कार्डसचा वापर करत पेमेंट करू शकता.
2. नेहमी सुरक्षित पेमेंट पद्धतींचा वापर करा
नेहमी सुरक्षित व विश्वसनीय डिजिटल पेमेंट पद्धतींची निवड करा. त्यामुळे व्यवहारांसाठी एन्क्रिप्शन, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि टोकनायझेशनच्या अतिरिक्त सुरक्षिततेसह तुमची कोणतीही फसवणुक होणार नाही.
3. कॉन्टॅक्टलेस कार्डचा वापर करा
ईएमव्हीसीओ® चिप-आधारित कॉन्टॅक्टलेस कार्डससह (तुमच्या कार्डवर वाय-फाय सारखे चिन्ह दिसेल) तुम्ही कार्ड हातामध्येच घेऊन पीओएस टर्मिनलवर तुमचे कार्ड टॅप करत जलदपणे, सुरक्षितपणे पेमेंट्स करू शकता.
4. बँकिंग अॅप्सच्या माध्यमातून व्यवसहारांवर नियंत्रण ठेवा
तुमच्या वापरातल्या रोजच्या बॅंकिंग अॅपमधून सोईस्करपणे कॉन्टॅक्टलेस, ई-कॉमर्स, एटीएम विद्ड्रॉवल्स आणि आंतरराष्ट्रीय कार्ड व्यवहार कार्यान्वित (Executed) किंवा अकार्यान्वित करा. यात तुम्ही योग्य ठिकाणीच खर्च करण्याचं नियोजन करू शकता.
5. रिअल टाइम अलर्टससह व्यवहारांवर देखरेख ठेवा
तुम्ही कधीही बॅंकींग करताना त्यावर येणारे संदेश अलर्ट तपासत राहा. तुम्हाला प्रत्येक वेळी पेमेंट केल्याने अलर्ट येत राहिल.
6. क्रेडिट कार्ड पेमेंट्ससह फायदे वाढवा
तुम्हाला बॅंकेतून कॅशबॅक ऑफर्स, रिवॉर्ड पॉइण्ट्स आणि विशेष सूटचा फायदा सुद्धा घेता येऊ शकतो. तसेच, प्रत्येक व्यवहारावराचे फायदे मिळवण्यासाठी ईएमआय पर्याय आणि मोफत सूटचा स्मार्टपणे वापर करा.
तसेत कधीही घाईत पेमेंट करताना वरील सर्व टिप्स लक्षात ठेवूनच पेमेंट कराय त्याने तुमचे अकाउंट नेहमी सुरक्षित राहिल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.