Gold Rate
Gold RateSaam Tv

Gold Rate: 1968 मध्ये सोन्याचा भाव किती होता? आता चहा पण त्यापेक्षा आहे महाग

Gold Rate From 1968 to 2025: सोन्याचे भाव १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे ग्राहक सोने खरेदी करत नाही. सोन्याचे भाव १९६८ मध्ये ६३.२५ रुपये प्रति तोळा होते.
Published on

सोन्याचे भाव हे १ लाखांच्या पार गेल आहेत. सोन्याचे भाव वाढत असल्याने मात्र खरेदीदार सोने खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. ऐन लग्नसराईच्या काळात सोनाराच्या दुकानाबाहेर गर्दी नाहीये. परंतु सोन्याचे भाव आता मागील काही वर्षात वाढले आहेत.आधी सोने खूप जास्त स्वस्त होते. तुमच्या आईवडिलांच्या लग्नात सोने फक्त काही हजार रुपयांवर होते.

सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात जास्त सुरक्षित मानली जाते. भविष्यात तुमच्याकडे असलेल्या सोन्याला अजूनच भाव येणार आहे. सोन्याचे भाव आता सध्यापेक्षा जास्त कमी होणार नाही. १९६४ मध्ये सोन्याचे किंमत फक्त ६.२३ रुपये प्रति ग्रॅम होती. आता एवढ्या किंमतीत साधा चहादेखील मिळत नाही. १ ग्रॅम सोन्यासाठी आज ९५७३ रुपये झाली आहे. सोन्याच्या किंमतीत खूप जास्त वाढ झाली आहे.

Gold Rate
Gold Price History : भारतात १९५९ साली १० ग्रॅम सोन्याची किंमत किती होती? बिल पाहून चकीत व्हाल

१९६४ पासून सोन्याचे भाव

१९६४ मध्ये सोन्याचे भाव ६३.२५ रुपये प्रति तोळा होते. प्रति ग्रॅम सोने ६.३५ रुपयांना होते. १९६५मध्ये सोने ७१.७५ रुपये प्रति तोळा विकले जात होती. १९६६ मध्ये सोन्याची किंमत ८३.७५ रुपये होती. यानंतर ५ वर्षांनी १९७० मध्ये सोन्याची किंमत प्रति तोळा १८४ रुपये होती. १९७१ मध्ये ही किंमत १९३ रुपये प्रति तोळा झाली होती. १९७२ मध्ये सोने २०२ रुपये प्रति तोळा आहे.

Gold Rate
EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बेसिक पेन्शन ७५०० रुपये होणार?

१९८० मध्ये सोन्याची किंमत १ हजारांपेक्षा जास्त झाली. सोन्याची किंमत प्रति तोळा १,३३० रुपये झाली होती. १९८१ मध्ये ही किंमत १८०० रुपये झाली होती.१९८२ मध्ये सोन्याची किंमत प्रति तोळा १६४५ रुपये झाली होती.

१९९० मध्ये सोन्याची किंमत प्रति तोळा ३,२०० रुपये होती. १९९१ मध्ये सोने ३,४६६ रुपये प्रति तोळा विकले जात आहे. १९९२ मध्ये सोन्याची किंमत प्रति तोळा ४,३३४ रुपये होती. १९९३ मध्ये सोन्याची किंमत ४,१४० रुपये होती

२००० मध्ये सोन्याची किंमत ४ हजारांवर पोहचली होती. २००१ मध्ये सोन्याची किंमत ४,३०० रुपये प्रति तोळा झाली होती. २००२ मध्ये सोन्याची किंमत ४९९० रुपये झाली होती. २००३ मध्ये सोन्याची किंमत ५,६०० रुपये प्रति तोळा होती. २००४ मध्ये सोन्याची किंमत ५,८५० रुपये प्रति तोळा होती.

२०११ मध्ये सोन्याचे दर प्रति तोळा २६,४०० रुपये होते. २०१२ मध्ये सोन्याची किंमत ३१,०५० रुपये प्रति तोळा होती. २०१३ मध्ये सोन्याची किंमत २९,६०० रुपये प्रति तोळा आहे. २०१४ मध्यो सोन्याची किंमत २८,००६ रुपये होती.

Gold Rate
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! रोज ३३३ रुपये गुंतवा अन् फक्त व्याजातून ५ लाख कमवा

२०२१ मध्ये सोन्याची किंमत ४८,७२० रुपये होती. २०२२ मध्ये ५२,६७० रुपये प्रति तोळा होती. २०२३ मध्ये ही किंमत ५२,७९० रुपये होती. २०२४ मध्ये सोने ७३,७८० रुपये प्रति तोळा होते.२०२५ मध्ये सोन्याची किंमत ९५,७३० रुपये प्रति तोळे विकले जात आहे.

Gold Rate
Gold Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com