Ayushman Bharat Golden Card: आयुष्मान भारत गोल्डन कार्ड नक्की आहे तरी काय? कसं मिळवायचं? वाचा सविस्तर

Ayushman Bharat Golden Card News: केंद्र सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड योजना राबवली आहे. या योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात.
Ayushman Bharat Golden Card
Ayushman Bharat Golden CardSaam Tv
Published On

केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. सरकारने नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी एक योजना राबवली आहे. या योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. यासाठी आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. दरम्यान, आता या योजनेअंतर्गत नागरिकांना गोल्डन कार्ड मिळणार आहे. हे गोल्डन कार्ड नक्की आहे तरी काय ते जाणून घ्या. (Ayushman Bharat Card)

Ayushman Bharat Golden Card
MHADA Scheme : स्वस्त घराची संधी! ३१ ऑगस्टपर्यंत म्हाडा घरांसाठी अर्ज करा, सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या

'एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (एबी-पीएमजेएवाय) आणि 'महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने'चा लाभ मिळवण्यासाठी हे कार्ड गरजेचे आहे. या योजनेत गोल्डन कार्ड बनवण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष मोहिम राबवण्यात आली आहे. नागरिकांना कार्ड तयार करण्याचे आवाहन केले आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. यासाठी काही रुग्णालये निश्चित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत १ हजार ३६५ प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे. या योजनेत ७० वर्षांवरील जास्त वयोगटातील नागरिकांना आयुष्मान भारत वंद कार्डच्या माध्यमातून लाभ घेतला जातो.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आयुष्यमान गोल्डन कार्ड असणे बंधनकारक आहे. हे कार्ज आर्थिकदृष्ट्या दुर्बल वयोगटातील नागरिकांना मिळते. (Ayushman Bharat Golden Card)

Ayushman Bharat Golden Card
SRA Scheme: वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर मोर्चा; पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवलं, VIDEO

आयुष्मान गोल्डन कार्ड कसं बनवायचं? (How To Make Ayushman Golden Card)

यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे. तुम्हाला सर्वात आधी आयुष्मान अॅप डाउनलोड करायचा आहे. किंवा https://beneficiary.nha.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्मान गोल्डन कार्ड मिळेल. ३० ऑगस्टपर्यंत हे कार्ड बनवण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

Ayushman Bharat Golden Card
Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com